इगतपुरी शिवसेनेतर्फे जेष्ठ नागरिकांना ५०० छत्र्यांचे वाटप 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना व प्रभाग क्रमांक चार गावठा येथील ज्येष्ठ नागरिकांना सुमारे ५०० छत्र्यांचे वाटप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मोहन बऱ्हे, शहरप्रमुख भूषण जाधव, सामाजिक कार्यकर्ते निखिल वखारे, नीता वारघडे यांच्या हस्ते करण्यात आले. इगतपुरी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांवर संस्कार करण्याचे खरे काम ज्येष्ठ नागरिकच करतात. वयाची साठी ओलांडल्यानंतर केवळ नातवंडांमध्ये न रमता अनेकजण कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतात. ही अभिमानास्पद बाब असून पावसापासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी शिवसेनेतर्फे यंदा छत्र्यांचे वाटप करण्यात आल्याचे भूषण जाधव यांनी सांगितले. पावसाळा आणि उन्हाळ्यात आम्हाला ही छत्री निश्चितच उपयोगी पडेल. शिवसेनेने दिलेली भेटवस्तू आमच्यासाठी लाखमोलाची असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे कैलास विश्वकर्मा यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक दिनेश कोळेकर, उमेश कस्तुरे, सामाजिक कार्यकर्ते अलीम गलेरीया, योगेश भडांगे, श्रीकांत मुळीक, संकेत कोरडे, दिलीप खातळे, रवी भागडे, महेंद्र सिंग, आकाश डावखर, विष्णू डावखर, अनुज लोया, अंशूल मेहरोत्रा, संतोष गायकवाड, प्रथमेश गोडे, रंगनाथ भागडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!