इगतपुरीनामा न्युज – २००८ मध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गट युवासेना उपजिल्हाप्रमुख मिथुन राऊत यांच्यावर आणि त्यांचे सहकारी पेठ पंचायत समितीचे माजी सभापती अंबादास चौरे, आमलोण ग्रामपंचायत माजी सरपंच प्रकाश बोरसे, घनशेतचे माजी सरपंच कैलास चौधरी, हरसुलचे माजी सरपंच अशोक लांघे, मुरंबीचे माजी सरपंच अर्जुन मौळे, गावठाचे माजी सरपंच हिरामण […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील थेट सरपंचपदांसाठी यापूर्वी काढलेले आरक्षण २०२० पासून ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी लागू आहे. मात्र आरक्षणाची टक्केवारी न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलली जाणार आहे. यासाठी इगतपुरी तहसीलदार कार्यालयात ९ जुलैला दुपारी बारा वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. अनुसूचित क्षेत्रातील सरपंच आरक्षण जवळपास जैसे थे असणार […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा गटसचिव व कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र देवीदास नाठे यांची बिनविरोध निवड झाली आहेत. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत ही निवड घोषित करण्यात आली.देविदास नाठे यांचे जिल्ह्यातील सर्व सचिवांकडुन अभिनंदन करण्यात आले. निवड झाल्यानंतर सचिव संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ निकम, मालेगावचे भिला निकम, सिन्नरचे किरण गोसावी, […]
इगतपुरीनामा न्यूज – शेतकऱ्यांनी हमी भावासाठी अनेक वेळा दिल्लीत आंदोलने केली. सरकारने नेहमी डोळेझाकपणा करून हमीभावाचा कायदा केला नाही. हा कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. उद्याची लढाई जिंकायची, देशाला वाचवायचे असेल तर भाजपला सत्तेतून उखडून टाका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घोटीत केले. नाशिक लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी […]
इगतपुरीनामा न्यूज – खासदार सैनिक होऊ शकत नाही परंतु एक सैनिक खासदार होऊन देशाची सेवा नक्कीच करू शकतो. जनतेचे विविध प्रश्न, समस्या सोडवू शकतो. अधिकाधिक मते देऊन मला सेवेची संधी द्यावी असे आवाहन नाशिक मतदारसंघातील सैनिक समाज पार्टीच्या उमेदवार जयश्री महेंद्र पाटील यांनी केले आहे. देशासाठी जीवाची बाजी लावून सैनिक लढतात, त्याकामी त्यांच्या कुटुंबाचेही तितकेच […]
इगतपुरीनामा न्यूज – भारतीय अस्मिता पार्टीचे उमेदवार ॲड. यशवंत पारधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडी शिवसेना उबाठाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला आहे. ॲड. उद्धव रोंगटे, संदीप गंभीरे, अनिल निसरड, राजाराम कोरडे, दत्तू बांबळे, तुषार नवाळे, मारुती गंभीरे यावेळी हजर होते. यशवंत पारधी हे एक उच्चशिक्षित असून शिक्षण, […]
लेखन – वृषाली पाटील, माहिती अधिकारी, कोल्हापूर सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. निवडणुक प्रक्रियेमध्ये मतदार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मतदारांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांच्या मदतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विविध सोयी सुविधा व “ॲप्स” […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या पक्षात नाशिक लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा वाढला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उमेदवारी करणार नसल्याची घोषणा करून राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे सांगितले होते. यातच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना […]
भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात नेहमीच इंदिरा काँग्रेसचे प्राबल्य सिद्ध झालेले आहे. सलग ३ पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत विरोधक एकत्र येऊनही इंदिरा काँग्रेसला विजयापासून रोखू शकलेले नाही. भौगोलिक रचनेत त्र्यंबकेश्वर हा संपूर्ण तालुकाही ह्या मतदार संघात निर्णायक मतांची आघाडी देत असतो. जातीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर असल्याने मतांचे होणारे विभाजन विजयी उमेदवाराच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या इगतपुरी तालुकाप्रमुखपदी दांडगा जनसंपर्क असणारे राजाभाऊ भिवाजी नाठे यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिजाबाई राजाभाऊ नाठे यांच्या माध्यमातुन इगतपुरी पंचायत समिती सभापतीपदावर त्यांनी चांगले काम केलेले आहे. निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे जिल्ह्यात पाहिले जाते. दुसऱ्यांदा या पदावर वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या गोंदे […]