
इगतपुरीनामा न्यूज – शेतकऱ्यांनी हमी भावासाठी अनेक वेळा दिल्लीत आंदोलने केली. सरकारने नेहमी डोळेझाकपणा करून हमीभावाचा कायदा केला नाही. हा कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. उद्याची लढाई जिंकायची, देशाला वाचवायचे असेल तर भाजपला सत्तेतून उखडून टाका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घोटीत केले. नाशिक लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी आणि छावा क्रांतिवीर सेनेचे उमेदवार करण गायकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. करण गायकर हुशार नेतृत्व असून अनेक उपेक्षितांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे असेही ते म्हणाले. याप्रसंगी वंचीत बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष पवन पवार, नंदुभाऊ पगारे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, महासचिव मिलिंद शिंदे, तालुका निरीक्षक दादाभाऊ शिरसाठ, महिला अध्यक्षा संगीता शेनोरे, शहराध्यक्षा रंजना साबळे, नीता सोनवणे, मिराताई भोसले, शहराध्यक्ष सचिन चोपडे, संघटक संतोष उबाळे, उपाध्यक्ष एन. के. सोनवणे, संपर्कप्रमुख रमेश पंडित, भूषण पंडित, सुनील चंद्रमोरे, प्रकाश आव्हाड, बौद्धाचार्य मोरे गुरुजी, शरद सोनवणे, डॉ. गाडे, छावा क्रांतिवीर सेनेचे नारायण जाधव, तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, हरीश कुंदे, बाळू सुरुडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भारत बुकाणे यांनी केले.