
इगतपुरीनामा न्यूज – भारतीय अस्मिता पार्टीचे उमेदवार ॲड. यशवंत पारधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडी शिवसेना उबाठाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला आहे. ॲड. उद्धव रोंगटे, संदीप गंभीरे, अनिल निसरड, राजाराम कोरडे, दत्तू बांबळे, तुषार नवाळे, मारुती गंभीरे यावेळी हजर होते. यशवंत पारधी हे एक उच्चशिक्षित असून शिक्षण, रोजगार, आरोग्य, दळणवळण, तसेच अनेक समस्यांवर ते पूर्वीपासूनच काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी महाविकास आघाडीला समर्थन दिल्याने महाविकास आघाडीला चांगला फायदा होणार आहे. लोकशाही वाचविण्यासाठी व टिकविण्यासाठी पुरोगामी विचारांच्या सर्व संघटना व राजकीय पक्षांनी देशातील हुकूमशाही विरोधात एक वज्रमूठ तयार केली आहे. याचा भाग म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ ( पराग ) वाजे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. मशाल चिन्हासमोरील बटण दाबून राजाभाऊ वाजे विजयी करावे असे आवाहन ॲड. यशवंत पारधी यांनी केले.