इगतपुरीनामा न्यूज : बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला असून तो मुहूर्त नक्की कोणता असणार याबाबत शनिवारी सविस्तर माहिती मिळणार आहे. निवडणूक आयोगाचे जॉइंट डिरेक्टर (मीडिया) अनुज चांडक यांनी आजच याबाबत एक पत्र प्रसिद्ध केले असून उद्या (शनिवार) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचा संपूर्ण इतिहास बंडखोरी आणि पक्षांतरे यांच्याशिवाय कधी पूर्ण होऊ शकत नाही. एका पक्षाने मोठे केल्यानंतर त्या पक्षाला झुगारून दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली जाण्याचा इथे इतिहास आहे. आमदारकी मिळवण्यासाठी असा आटापिटा ह्या मतदारसंघात बऱ्याचदा घडून आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी आणि पक्षांतराची स्थित्यंतरे […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्या असुन यासाठी प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. युवकांनी गावनिहाय कमिटी तयार कराव्यात, विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन पक्ष वाढवावा असे आवाहन इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांनी केले. खंबाळे ता. इगतपुरी येथे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी पांडुरंग वारुंगसे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार शिवराम झोले, जेष्ठ नेते रतन पाटील जाधव, माजी सरपंच वसंत भोसले आदींच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र प्रदान […]
इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती संभाजी राजे यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याबाबत स्वराज्य पक्षाची नाशिक जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. प्रास्ताविकात उमेश शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करून बैठकीबद्धल मार्गदर्शन केले. स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात मर्द मावळे, बहुजन समाज, अठरापगड जातीतील वंचित, कष्टकरी, दिनदुबळ्या, श्रमजीवी यांच्या अथक परिश्रमातून स्वराज्य […]
इगतपुरीनामा न्यूज – भारत निवणूक आयोगाच्या १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या सुधारीत कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२३ ह्या दिवशी प्रसिध्द होणार आहे. त्याअन्वये प्रारुप मतदार यादीसाठी ९ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षपदावरील नुकतीच सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गोरख बोडके यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरख बोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर आज निवड करण्यात आली. यासोबतच […]
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी इगतपुरी तालुकाध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यार्थी काँग्रेसपासून ते युवक काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केलेले उमेश खातळे यांच्या कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटकपदी त्यांची निवड केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी मेहबूब शेख उपस्थित होते. उमेश खातळे […]
इगतपुरीनामा न्यूज – निवडणुकीदरम्यान मतदारांना भेटण्यासाठी चपला झिजवणारे लोकप्रतिनिधी त्यानंतर पुढील पाच वर्ष अजिबात दिसत नसल्याची खंत अनेकदा व्यक्त होते. पण नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे दुसऱ्यांदा आपल्या कामगिरीचं प्रगतीपुस्तक घेऊन जनतेसमोर आले आहेत. आ. तांबे यांनी २०० दिवसांचं सर्वेक्षण घेत जनतेला आपल्या कामाचं मूल्यमापन करायला सांगितलं होतं. आताही ते ऑनलाइन माध्यमातून लोकांसमोर गेले […]
इगतपुरीनामा न्यूज : आधार कार्ड धोरणांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बदलांमुळे आता नवीन आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी जन्म दाखला पुरावा जोडणे बंधनकारक आहे. जन्म दाखल्याशिवाय अन्य कुठलाही पुरावा यासाठी ग्राह्य मानला जात नाही. यापूर्वी जन्म दाखला नसला तरी केवळ रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रांच्या आधारे सुध्दा नवीन आधार कार्ड नोंदणी करणे शक्य होते, मात्र या वर्षी […]