डॉ. शरद तळपाडे – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचे व्हिजन असणारे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे दोन्ही आदिवासीबहुल तालुके मिळून विधानसभा मतदारसंघ आहे. सूक्ष्मपणे अभ्यास केल्यावर दोन्हीही तालुक्यातील अनेक मूलभूत समस्या सर्वांसमोर आ वासून उभ्या आहेत. ह्या मतदारसंघातील स्थानिक कुशल तरुणांना हक्काचा रोजगार नाही, आदिवासी वाड्या वस्त्यासह विविध गावांतील खड्डेमय रस्ते वर्षानुवर्षे जैसे थे आहे. दुर्दैवाने ह्या दोन्हीही तालुक्याची ओळख समस्यांचे […]

इगतपुरी तालुक्यातील ‘या’ शिलेदारांनी जिल्ह्यातील अन्य जि. प. गटातुन मिळवली होती विजयश्री

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला काही काळातच सुरुवात होणार आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी करून उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावला आहे. यातच स्थानिक आणि बाहेरचे उमेदवार हा विषय जास्तच पसरत चालला आहे. इगतपुरी तालुक्याच्या इतिहासात मतदारसंघाच्या बाहेर जाऊन विजयी होणारे व्यक्ती आहेत तर तालुक्यातील आपला मूळ जिल्हा परिषद गट सोडून अन्य […]

पूर्वतयारी आमदारकीची – कोण आहेत इच्छुक उमेदवार ? कोणाला मिळेल उमेदवारी ? कसे असेल निवडणुकीचे चित्र ?

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज – काही अपवाद वगळता सातत्याने इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराच्या गळ्यात आमदारकी देणारा इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांतील प्रबळ इच्छुक उमेदवारही तिकिटासाठी प्रयत्न करायला लागले आहेत. ही जागा इंदिरा काँग्रेसची असल्याने विद्यमान आमदार हिरामण खोसकर […]

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर नाना पटोले यांच्यावर का संतापले ?

इगतपुरीनामा न्यूज – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमधून उभा राहिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा परभव झाला. मतदान करताना काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय या आमदारांवर पक्ष श्रेष्ठींकडून कारवाई होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते. या आमदारांमध्ये काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे […]

इगतपुरी तालुक्यातील ओबीसी आरक्षणावर गंडांतर ; सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणासाठी ९ जुलैला सभा : “ह्या” ९ ग्रामपंचायतींचे आरक्षण बदलण्याची शक्यता

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील थेट सरपंचपदांसाठी यापूर्वी काढलेले आरक्षण २०२० पासून ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी लागू आहे. मात्र आरक्षणाची टक्केवारी न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलली जाणार आहे. यासाठी इगतपुरी तहसीलदार कार्यालयात ९ जुलैला दुपारी बारा वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. अनुसूचित क्षेत्रातील सरपंच आरक्षण जवळपास जैसे थे असणार […]

आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांचा २४ जून पासून जनसंवाद दौरा : इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ पिंजून काढणार

इगतपुरीनामा न्यूज – लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर काँग्रेसने आता आपला मोर्चा विधानसभेच्या निवडणुकीकडे वळवला आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वर्गात लोकप्रिय असलेले उदयोन्मुख नेतृत्व लकी जाधव यांच्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मतदार संघ पिंजून मतदार संघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्यांचे […]

ॲड. संदीप गुळवे – ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे समर्थ नेतृत्व : महाविकास आघाडी आणि टिडीएफतर्फे भरणार उमेदवारी अर्ज

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – राज्याच्या विविध भागात ज्यांच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने हजारो कुटुंबांत चूल पेटते असे दैदीप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र स्व. लोकनेते गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे. आईवडील आणि देवांच्या सोबत स्व. दादासाहेबांची प्रतिमा अनेक घरात पूजली जाते, कारण त्या त्या लोकांसाठी ते देवस्वरूप होते. राजकारण आणि पक्ष न पाहता अनेकांची […]

राजाभाऊ वाजे यांना दिल्लीसाठी मदत करणारा इगतपुरी विधानसभा मतदारसंघ : कसे मिळाले यश ? कोणाचे चुकले ? कोणाला होणार फायदा ? : आगामी विधानसभा निवडणुकीत कसे असेल चित्र ?

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज – अपेक्षेप्रमाणे नाशिक लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेला कौल महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने झुकणारा आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात अधिकाधिक मतांचे दान टाकल्याचे दिसते. इंदिरा काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार तथा शिवसेना उपनेत्या निर्मला गावित यांचे मतदारसंघात सत्तास्थान भक्कम करणारा […]

वाकी बिटुर्ली येथील समता महिला ग्रामसंघाकडून मतदान जनजागृतीसाठी पुढाकार : २१ महिला बचत गटाच्या महिलांनी नोंदवला सहभाग

इगतपुरीनामा न्यूज – लोकशाही बळकटीसाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. ह्या कर्तव्याची जाणीव ठेवून नागरिकांनी मतदान करणे काळाची गरज आहे. हे सिद्ध करीत स्त्री शक्ती महिला प्रभाग संघ वाकी बिटुर्ली येथील समता महिला ग्रामसंघाने मतदान जनजागृती अभियानात पुढाकार घेत मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाचे महत्व पटवून दिले. यात २१ गटांच्या महिलांनी सहभाग नोंदवून मतदार राजाचे […]

‘या’ मतदान केंद्रात अद्यापही २५० मतदारांचे मतदान बाकी : रात्री ९ पर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातील वायघोळ मतदार केंद्रात सायंकाळी ६ नंतरही किमान २५० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे आहेत. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर ही गर्दी असून आतापर्यंत ह्या केंद्रात ८०२ मतदान पार पडलेले आहे. १ हजार ३०० मतदार संख्या असलेल्या ह्या मतदान केंद्रात रात्री ९ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहील असा अंदाज […]

error: Content is protected !!