
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर वंचित बहुजन आघाडीच्या अपर्णा चंद्रशेखर धात्रक यांना एकदा संधी द्या. यासह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी करा. आम्ही इगतपुरीचा विकास काय असतो हे दाखवून देऊ. रस्ते, पाणी, आरोग्य, मूलभूत सुविधा आणि पारदर्शक कारभार करून नागरिकांना आनंदी करू. इगतपुरी शहरात सर्वधर्मीय नागरिकांची परंपरा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांनुसार आणि संविधानानुसार इथले नागरिक सुखी करण्याचे काम आम्ही करू. अपर्णा धात्रक ह्या अत्यंत अनुभवी नेतृत्व असून त्यांच्या गॅस सिलेंडर निशाणीसमोरील बटण दाबून ह्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश नेते अमित भुईगळ यांनी केले. इगतपुरी येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. या इगतपुरीत आम्ही सत्ता काबीज करू शकतो. आम्हाला सर्वांना एकत्र यावं लागेल. आम्हाला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करावी लागेल. नगराध्यक्ष पदावर अपर्णा धात्रक आणि उमेदवार आम्हाला प्रचंड मतांनी निवडून आणावे लागेल. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी इगतपुरीत परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश नेते अमित भुईगळ, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अपर्णा शेखर धात्रक, जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, उर्मिला गायकवाड, नाशिक जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, सागर रिपोर्ट, बी. आर. जाधव, दीपक भंडारी, प्रशांत अहिरे, मिहिर गजभिये, बाळासाहेब शेजवळ, नाना तपासे, संतोष वाघ, मनोज उबाळे, तालुकाध्यक्ष शरद सोनवणे, डॉ. आर. वाय. गाडे, शहराध्यक्ष सचिन चोपडे, उपाध्यक्ष अविनाश तेलोरे, दादा मामा शिरसाठ, नंदू पगारे, मधुकर बागुल, अक्षय शिंदे, रमेश पंडित नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.