
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असून प्रभाग क्र. ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ पक्षाचे उमेदवार मंगेश शिरोळे यांना जोरदार प्रतिसाद लाभत आहे. आज आदिवासी सेनेचे प्रमुख दि. ना. उघाडे यांनी उमेदवार मंगेश शिरोळे यांना पाठिंबा घोषित केला आहे. प्रभाग क्र. ९ मधील मतदार बंधू भगिनींनी मंगेश शिरोळे यांच्या घड्याळ निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आदिवासी सेनाप्रमुख दि. ना. उघाडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, शिवसेना धनुष्यबाण रिपब्लिकन सेना महायुतीचे प्रभाग ९ मधील दमदार उमेदवार म्हणून मंगेश शिरोळे लोकप्रिय आहेत. आदिवासी सेनेचा बिनशर्त पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या विजयाच्या मतांमध्ये मोठी वाढ होणार आहे. प्रभागाच्या शाश्वत विकासासाठी मंगेश शिरोळे यांनी शासकीय नोकरीचा त्याग केला असून त्यांचा त्याग आम्ही वाया जाऊ देणार नाही असे दि. ना. उघाडे यांनी म्हटले आहे.