इगतपुरी – थेट नगराध्यक्ष आणि २१ नगरसेवकांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद : निकालासाठी २१ डिसेंबरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपालिकेच्या २१ नगरसेवक जागांसाठी आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. निवडणुकीसाठी संध्याकाळी साडेपाच पर्यंत ६८.६८ टक्के मतदान झाले आहे. ८ हजार ७८९ पुरुष, तर ८ हजार ४३५ महिला अशा एकूण १७ हजार २२४ मतदारांनी मतदान केले. न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अप आणि रिपब्लिकन सेना महायुती, भाजपा, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीने रिंगणात उतरून लढाई दिली. १० प्रभागात नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या ४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला. सुरुवातीच्या टप्प्यात धीम्यागतीने मतदान झाले. पण नंतरच्या टप्प्यात मतदानास वेग आला. इगतपुरीच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, विनोद गोसावी यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदान केंद्रातील व्यवस्थेबाबत आढावा घेऊन मतदारांच्या सुविधांबाबत निर्देश दिले. मतदानासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडले नाही. सर्व उमेदवारांची यादी सविस्तर खाली पाहता येईल.

असे आहेत उमेदवार 
नगराध्यक्ष पद
शालिनी संजय खातळे, शिवसेना शिंदे
शुभांगी यशवंत दळवी, राष्ट्रीय काँग्रेस
अपर्णा चंद्रशेखर धात्रक, वंचित बहुजन आघाडी
मधूमालती रमेश मेंद्रे, भाजपा
प्रभाग क्र. १ अ
अजय भागवत जगताप, भाजपा
अतिश बाळू दोंदे, अपक्ष
नंदकुमार विठ्ठल भोंडवे, काँग्रेस
युवराज बाजीराव भोंडवे, राष्ट्रवादी अप
सतीश प्रभाकर यादव, शिवसेना उबाठा
प्रभाग क्र. १ ब
लंका रामदास कामडी, शिवसेना उबाठा
अंजुम अस्लम कुरेशी, राष्ट्रवादी अप
हसीना जाकीर कुरेशी, काँग्रेस
मीराबाई देविदास सोपनर, भाजपा
प्रभाग क्र. २ अ
सागर अनिल आढार, राष्ट्रवादी अप
बाळू दशरथ कौटे, शिवसेना उबाठा
विजय निवृत्ती जाधव, भाजपा
शरद निवृत्ती बांबळे, राष्ट्रवादी शप
प्रभाग क्र. २ ब
नाझनीन असगर खान, राष्ट्रवादी अप
नाहिद सुबहानमिया पटेल, भाजपा
प्रभाग क्र. ३ अ
वैशाली विजय आडके, भाजपा
वैशाली सतीश कर्पे, शिवसेना शिंदे
प्रभाग क्र. ३ ब
रोहिदास हरिश्चंद्र डावखर, शिवसेना शिंदे
विष्णू भीमराव डावखर, शिवसेना उबाठा
संपत शंकर डावखर, भाजपा
प्रभाग क्र. ४ अ
माला नंदू गवळे, शिवसेना शिंदे
सुरेखा दिनकर मोरे, शिवसेना उबाठा
अनिता सनी शिंदे, भाजपा
रंजनाबाई नथू साबळे, वंचित
प्रभाग क्र. ४ ब
गौरव सुरेश कांबळे, वंचित
अर्जुन खंडू खातळे, शिवसेना शिंदे 
रमेश भास्कर खातळे, भाजपा
भूषण प्रभाकर जाधव, शिवसेना उबाठा
प्रभाग क्र. ५ अ
उमेश अशोक कस्तुरे, शिवसेना शिंदे
विशाल रमेश चांदवडकर, भाजपा
प्रभाग क्र. ५ ब
परवीन आसिफ खान, शिवसेना उबाठा
निलोफर मुन्ना शेख, भाजपा
निकत वसीम सय्यद, राष्ट्रवादी अप
प्रभाग क्र. ६ अ
मयुरी राहुल पुरोहित, राष्ट्रवादी अप
सिद्धी गजानन शिरसाठ, भाजपा
प्रभाग क्र. ६ ब
आशा सुनील थोरात, राष्ट्रवादी अप
दुर्गा विलास बोरकर, भाजपा
प्रभाग क्र. ६ क
नईम रज्जाक खान, भाजपा
योगेश संजय चांदवडकर, अपक्ष
फिरोजभाई रमजान पठाण, राष्ट्रवादी अप
प्रभाग क्र. ७ अ
शशिकांत नारायण बर्वे, भाजपा
सतीश सखाराम मनोहर, राष्ट्रवादी अप
पंकज अरुण रोकडे, वंचित
प्रभाग क्र. ७ ब
सिद्धी धर्मेंद्र जाधव, अपक्ष
शकुंतला बाळू पंडित, वंचित
वैष्णवी समीर यादव, शिवसेना उबाठा
भारती मंगेश शिरोळे, राष्ट्रवादी अप
प्रभाग क्र. ८ अ
रत्नाबाई विजय जाधव, शिवसेना उबाठा
संध्या किशोर देहाडे, वंचित
वंदना सुनील रोकडे, भाजपा
रजनी गजेंद्र बर्वे, शिवसेना शिंदे
प्रभाग क्र. ८ ब
राजेंद्र सुरेश जावरे शिवसेना शिंदे
गणेश वैजनाथ भराडे, शिवसेना उबाठा
लक्ष्मण मंगळू भागडे, भाजपा
प्रभाग क्र. ९ अ
माया अनिल बागुल, शिवसेना उबाठा
आशा प्रशांत भडांगे, राष्ट्रवादी अप
मंगला संजय भरीत, काँग्रेस
माधुरी चंद्रकांत आढाव, भाजपा
प्रभाग क्र. ९ ब
संजय संपतराव इंदुलकर, भाजपा
कुणाल बुधा घोरपडे, वंचित
राजेंद्र शांतीलाल पंचारे, शिवसेना उबाठा
भगवान विठ्ठल मडके, अपक्ष
मंगेश लक्ष्मण शिरोळे, राष्ट्रवादी अप
प्रभाग क्र. १० अ
संतोषी ऋतिक पगारे, अपक्ष
मंजुळा देवराम भले, भाजपा
पूनम किरण भोईर, काँग्रेस
ललिता नामदेव लोहरे, राष्ट्रवादी अप
प्रभाग क्र. १० ब
किरण लक्ष्मण बिन्नर, भाजपा
ज्ञानेश्वर नानासाहेब रायकर, काँग्रेस
शोभराज धनराज शर्मा, राष्ट्रवादी अप
error: Content is protected !!