इगतपुरीनामा न्यूज, दि. 17 इगतपुरी तालुक्यात 5 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सर्वच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक आघाण, आवळी दुमाला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लताबाई भले, भावली बुद्रुकच्या सरपंचपदी लक्ष्मण घोडे, भरवजच्या सरपंचपदी जाईबाई भले, अडसरे खुर्दच्या सरपंचपदी काळू साबळे निवडून आले. ग्रामपंचायतीचे निकाल पाहता युवकांचे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 11 आदर्श गाव मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली ही निवड झाली आहे. ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य असून प्रत्येकाला ग्रामविकास कामकाजाचा अनुभव यावा म्हणून आवर्तन पद्धत निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक सहा महिन्यांनी विद्यमान उपसरपंच स्वतःहून राजीनामा देतात. यामुळे पुढील सदस्याला […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 6 भारत निवडणूक आयोगाद्वारे १ नोव्हेंबर २०२२.या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. ही नोंदणी १ ऑक्टो ते ७ नोहेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे. पदवीला १ नोहेंबरला ३ वर्ष पूर्ण होणाऱ्या पदवीधर व्यक्तींनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन पदनिर्देशित सहाय्यक मतदार नोंदणी तथा […]
सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. 30 त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत वेळुंजे येथील वॉर्ड क्र. ३ ची जागा बिनविरोध झाल्याने तालुक्यात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. परंपरागत आमने सामने लढत असलेले शिवसेना नेते समाधान बोडके पाटील व राष्ट्रवादी नेते हरिभाऊ बोडके यांची लढत गेल्या 20 वर्षापासून कायमच तालुक्यात चर्चेचा विषय राहिला आहे. परंतु […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 30 आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या वतीने नाशिक तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य, सरपंच यांचा सन्मानसोहळा उत्साहात पार पडला. जातेगाव, ओझरखेड, धोंडेगाव, राजूर-बहुला, राजेवाडी, नाईकवाडी, नागलवाडी, गंगावऱ्हे, सावरगाव, दहेगाव, सारूळ, इंदिरानगर, वाडगाव, वासाळी, दुगाव, गणेशगाव, गोवर्धन या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य व लोकनियुक्त सरपंच यांना सन्मानित करण्यात आले. विधानसभा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 22 नाशिक जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासकीय प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेले अशासकीय प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. इगतपुरीच्या सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांची शासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सतीश खरे यांनी निर्गमित […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 14 राज्यात सध्या मतदार यादीतील तपशील प्रमाणीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये मतदार याद्या आधारकार्डशी संलग्न करण्यात येत असून मतदार यादीतील तपशील प्रमाणीकरण करण्यासाठी आधारकार्ड वरील नोंदींची मदत घेतली जात असून मोठ्या प्रमाणावर मतदार याद्या आधार कार्डशी संलग्न केल्या जात आहेत. इगतपुरी तालुक्याने यात आघाडी घेतली असून नुकताच 50 हजाराचा टप्पा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ इगतपुरी तालुक्यातील 5 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 13 ऑक्टोबरला होणार आहेत. अडसरे खुर्द, भरवज, आवळी दुमाला, कऱ्होळे, भावली बुद्रुक ह्या 5 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्या आहेत. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. थेट सरपंच पदासाठी मतदान करायचे असल्याने मतदार राजाचा कौल ग्रामविकासाला थेट हातभार लावण्यास मदत करणार आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ 26 जुलै २०२२ भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या असून या सुधारणांची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2022 ते 1 एप्रिल 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादीतील तपशील प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संकलीत करण्याकरीता 11 सप्टेंबर 2022 रोजी पहिल्या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुका ह्या पूर्वीप्रमाणे होणार असल्याचे आलेल्या आदेशानुसार जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या हेतूने इच्छुकांनी लढल्या होत्या त्या फलद्रुप होतील असे दिसते आहे. गावागावातील सोसायटीच्या निवडणुकांसाठी संभाव्य इच्छुक उमेदवार आणि नेतृत्व करणाऱ्या नेत्यांकडून विशेष लक्ष घातले होते. […]