एनडीपीटी शिक्षक बँक निवडणुकीत आपलं पॅनलकडून सभासदांना आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 2

नाशिक डिस्ट्रीक्ट प्रायमरी टिचर्स को-ऑप क्रेडीट सोसायटी येवला लि. नाशिक शिक्षक बँकेची निवडणूक 5 नोव्हेंबरला होत आहे. यापुर्वी प्रस्थापित शिक्षक संघटना एकमेकांवर चिखलफेक, आरोप प्रत्यारोप करून निवडणुक लढवत होते. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीत मात्र 6 + 5 + 4 हा फॉर्म्युला वापरून एकत्र येत एकता विकास नावाने निवडणुकीला सामोरे जात आहे. या प्रस्थापितांच्या एकत्र येण्याने मात्र सर्वसामान्य शिक्षक सभासदांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकत्र येण्यामागे पतसंस्थेचे हित की यापुर्वी आपण केलेल्या गैरकारभारावर हम साथ साथ है ची भुमिका मांडत आहेत असा सर्वसामान्य शिक्षक सभासदाला पडलेला यक्ष प्रश्न आहे.

प्रस्थापितांचा वर्षानुवर्ष पतसंस्थेत झालेला गैरकारभार मोडीत काढण्यासाठी इतर सर्व शिक्षक संघटना समन्वय पुरस्कृत आपलं पॅनल ( निशाणी – कपबशी ) निवडणुक लढवत आहेत. आपलं पॅनलमधुन सर्वसाधारण गटातुन भाऊसाहेब अहिरे, संतोष थोरात, प्रल्हाद पवार, सुनिल पवार, कैलास पाटोळे, प्रकाश पाडवी, मोतीराम भोये, हरिश्चंद्र भोये, पंडित महाले, भर्तरीनाथ सातपुते, अनुजाती जमाती संवर्गातून सोमनाथ पवार, महिला राखीव गटातून अरुणा गावित, सविता थविल, इतर मागास प्रवर्गातून संजय पगार, भटक्या विमुक्त गटातून रमेश गोहील यांनी शिक्षक बांधवांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचारमुक्त लढ्यासाठी, संस्थेच्या रक्कमांचा अपहार करणाऱ्यांच्या शोध घेण्यासाठी, कर्जावरील व्याजदर कमी करणे, सभासदांना पगार मर्यादेच्या प्रमाणात ३० लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे, DCPS / NPS बांधवांसाठी मृत्यूफंड १० लाख करणे, मयत कर्मचारी १०० % कर्ज माफ करणे, संस्थेचा कारभार स्वच्छ, प्रामाणिकपणे, पारदर्शक व अधिकाधिक सभासद हिताचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे आपलं पॅनलच्या जाहिरनाम्याव्दारे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!