इगतपुरी तालुक्यातील ५ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित :  युवकांचे निर्विवाद वर्चस्व झाले सिद्ध

इगतपुरीनामा न्यूज, दि. 17

इगतपुरी तालुक्यात 5 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला.  ग्रामपंचायतीच्या सर्वच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक आघाण, आवळी दुमाला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लताबाई भले, भावली बुद्रुकच्या सरपंचपदी लक्ष्मण घोडे, भरवजच्या सरपंचपदी जाईबाई भले, अडसरे खुर्दच्या सरपंचपदी काळू साबळे निवडून आले. ग्रामपंचायतीचे निकाल पाहता युवकांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग खातळे यांच्या नेतृत्वाखालील बहुचर्चित कऱ्होळे ग्रामपंचायतीमध्ये संपूर्ण पॅनल निवडून आले आहे. सरपंचपदी आमनेसामने झालेल्या लढतीत अशोक आघाण यांनी बाजी मारून सरपंचपदाचा मान पटकावला. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी आशा पांडुरंग खातळे, लता आघाण, मंदाबाई लाव्हरे, अंकुश आघाण, पंढरीनाथ खेताडे, जावीद शेख, नीलम भवर हे निवडून आले आहेत. आवळी दुमाला ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपदी लताबाई भले यांनी सरपंचपद पटकावले. धनंजय जमधडे, हिराबाई मेंगाळ, काळू मुकणे, कमल जमधडे, शैला जमधडे, रामचंद्र मुकणे, शकुंतला वाघ हे सदस्यपदी निवडून आले. भावली बुद्रुक सरपंचपदी लक्ष्मण घोडे निवडून आले. सदस्यपदी शांताराम बच्चे, मीराबाई पाचरणे, गोटीराम काळचीडे, लीलाबाई मधे, दीपक काळचीडे, हे निवडून आले. भरवज सरपंच जाईबाई भले, सदस्य सुरेश घारे, विठ्ठल घारे, गणेश नाडेकर, मोहिनी नाडेकर, ताराबाई डिगे, मनीषा घारे, अजय भले, शारदा साळवे, कल्पना भले, अडसरे खुर्द सरपंचपदी काळू साबळे, सदस्य सुदाम कवटे, सुनीता साबळे, ज्ञानेश्वर मोंढे, कमल गवारी, हिरामण भांगरे, वनिता ढेंगळे, शांताबाई भांगर हे निवडून आले.

ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांची विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब बनसोडे, साहेबू देशमुख, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, जयंत संसारे, रुपाली सावळे, महसूल सहाय्य्क राजकुमार भालेराव, मतमोजणी पर्यवेक्षक योगेश गोवर्धने, स्वप्नील अहिरे, संदीप दराडे, मतमोजणी सहाय्यक राम तौर, सचिन कल्याणकर, विजय खादे, कर्मचारी गणेश गणेशकर, नंदु वारे, मनोज परदेशी यांनी मतमोजणी कामकाज केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!