इगतपुरीनामा न्यूज, दि. 11
आदर्श गाव मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली ही निवड झाली आहे. ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य असून प्रत्येकाला ग्रामविकास कामकाजाचा अनुभव यावा म्हणून आवर्तन पद्धत निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक सहा महिन्यांनी विद्यमान उपसरपंच स्वतःहून राजीनामा देतात. यामुळे पुढील सदस्याला उपसरपंचपदावर संधी दिली जाते. हे 7 वे आवर्तन असून विठ्ठल जगताप यांच्या निवडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. याबाबतचे कुशल नियोजन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी केलेले आहे. त्यांनीही नूतन उपसरपंच यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकास करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या नेहमी पाठीशी आहे असे यावेळी गोरख बोडके म्हणाले.