
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. 2
आवळी दुमाला ग्रामपंचायतची निवडणुक मोठ्या चुरशीची होऊन त्यात निवडून आलेल्या शैला रामदास जमधडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. उपसरपंच निवडीच्या कार्यक्रमात सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन ही निवड झाली. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच लताबाई भले, नवनियुक्त सदस्य कमल कोंडाजी जमधडे, काळू भिवा मुकणे, रामचंद्र तुकाराम मुकणे, शकुंतला पंढरी वाघ, धनंजय जमधडे, हिराबाई मेंगाळ आदी उपस्थित होते.
शैला रामदास जमधडे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषित होताच ग्रामस्थांनी फटाके व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यावेळी दशरथ जमधडे, धोंडीराम जमधडे, ज्ञानेश्वर जमधडे, नंदू जमधडे, संजय जमधडे, रोहिदास जमधडे, हौशीराम मेदगे, मोहन जमधडे, लहानु जमधडे, योगेश जमधडे, गंगाधर जमधडे, शिवाजी जमधडे, अंबादास वाघ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी व सदस्यांनी आपल्यावर विश्वास दाखवुन मला काम करण्याची संधी दिली. मी विकासकामांमधुन गावाच्या विकासाचा नवा आलेख उभा करुन सार्थ ठरवेन असे नवनियुक्त उपसरपंच शैला रामदास जमधडे