भावली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेला मिळाले निर्विवाद यश : मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवडणूक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

इगतपुरी तालुक्यातील महत्वपुर्ण गाव असणाऱ्या भावली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलने बाजी मारली. या निवडणुकीत थेट सरपंचपदी लक्ष्मण घोडे निवडून आले. यामुळे तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी आपले खाते उघडल्याचे दिसुन आले. ग्रामपंचायतीच्या सर्वच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. इगतपुरी तहसील कार्यालयात आज झालेल्या मतमोजणीमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदी शांताराम बच्चे, मीराबाई पाचरणे हे निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांना संदीप इचम, भास्कर जाधव, सखाराम घोडे, तानाजी पाचरणे यांचे पाठबळ मिळाले. यावेळी ॲड. रतनकुमार इचम यांनी निवडुन आलेले थेट सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

भावली बुद्रुक गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी मनसेच्या विचारांचा सरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्य निवडून आमच्यावर विश्वास ठेवला आहे. आगामी काळात ग्रामविकास करण्यासाठी आम्ही बांधील असून नागरिकांचे ऋणी आहोत.
- ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष मनसे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!