इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी दूरगामी परिणाम करणारी बातमी आहे. आरक्षण देण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेला अहवाल फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. ह्या अहवालातील आकडेवारीनुसार ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व दिसत नसल्याचे कारण देण्यात आले […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि १४ मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल अथवा मे महिन्यात होण्याचे संकेत मिळाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुका घेण्याबाबत पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत सर्वच राजकीय पक्षांशी बैठकीद्वारे संवाद साधला. एप्रिल, मे महिन्यात विविध टप्प्यांमध्ये […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ विविध सर्व्हेक्षण, तपशील आणि ओबीसीची लोकसंख्या लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी ओबीसीला आरक्षण देता येणे शक्य आहे असा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत काही दिवसातच संपणार असल्याने राजकीय पक्षांना […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे वाढली आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती कायद्यात विद्यमान सदस्यांना मुदतवाढ देण्याची तरतूद नसल्याने प्रशासकाची नियुक्ती होणे जवळपास निश्चित झाले असल्याचे समजते. बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ ओबीसी आरक्षण नसेल तर स्थानिक स्वराज्य निवडणुका घेतल्या जाऊ नये यासाठीच्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केली आहे. यामुळे विधेयकाचे रूपांतर कायद्यात झाले आहे. परिणामी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. राज्यातील काही मनपा निवडणुका तोंडावर आल्याने थोड्याबहुत प्रमाणात प्रक्रिया सुरू करण्यात आली […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ इगतपुरी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नांदगाव बुद्रुक ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी मनीषा दिनकर गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. लोकनियुक्त सरपंच देवा मोरे आणि वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील झंझावाती विकासाचे शिल्पकार तथा गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव यांच्या संकल्पनेतून उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या ह्या बिनविरोध निवडीचे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील वार्ड क्रमांक १ च्या पोटनिवडणुकीत संतोष अर्जुन धोंगडे हे विजयी झाले आहेत. दिवंगत सदस्य बाळु सखाराम धोंगडे निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर झालेली पोटनिवडणूक तिरंगी झाली. सरपंच भाऊसाहेब धोंगडे, माजी सरपंच अशोक दगडू धोगडे या दोघांच्या नेतृत्वाखाली कु. संतोष अर्जुन धोंगडे यांनी ही निवडणूक जिंकली. संतोष अर्जुन धोंगडे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या बलायदुरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हिरामण दुभाषे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बलायदुरीचे माजी सरपंच मल्हारी गटखळ यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली हिरामण दुभाषे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केली. बऱ्याच दिवसांपासुन ह्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणुक असल्याने गावाचा विकास खुंटला होता. मात्र माजी सरपंच मल्हारी गटखळ […]
सुनील शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ टाके घोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया राबविण्यात आली. सरपंचपद आदिवासी महिला राखीव असल्याने या पदासठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने उपसरपंच असलेले मच्छिंद्र दोंदे यांच्यावर प्रभारी सरपंचाची धुरा सोपविण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी जयंत संसारे, सहाय्यक अधिकारी संदीप दराडे यांनी काम पाहिले. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक प्रतीक्षा करायला लावणारी आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. प्रभाग रचना, राजकीय आरक्षण सोडत, न्यायालयाचे निर्णय, नवीन गट निर्मिती आदींमुळे सर्वच अधांतरी लटकलेले आहे. इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्ष सुद्धा कधी नव्हे एवढ्या संभ्रमात आहेत. ओबीसी आरक्षणामुळे राज्य सरकार सुद्धा निवडणुकांना पुढे ढकलावे यासाठी अग्रेसर आहे. एकंदरीत […]