इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी दूरगामी परिणाम करणारी बातमी आहे. आरक्षण देण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेला अहवाल फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. ह्या अहवालातील आकडेवारीनुसार ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व दिसत नसल्याचे कारण देण्यात आले आहे. यासह राजकीय प्रतिनिधीत्वापासून वंचित आहे असे दिसत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आता होणाऱ्या निवडणुक ओबीसी आरक्षणाविना होणार आहेत. राज्य निवडणुक आयोगाने कालच घेतलेल्या बैठकीनुसार एप्रिल मे महिन्यात निवडणुका होणार असल्याचा अंदाज आहे.