मायदरा आदिवासी सोसायटीवर जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पॅनल विजयी : १३ जागांवर शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

इगतपुरी तालुक्यातील मायदरा, धानोशी, टाकेद खुर्द या गावांच्या एकत्रित मिळून असलेली मायदरा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे. ह्या संस्थेवर जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, श्रीपत पाटील लगड, माजी सरपंच यशवंत केवारे प्रणित शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद यश मिळविले आहे. संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी लागलेल्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने मोठी विजयी सलामी दिली आहे.भटक्या विमुक्त जाती जमाती मधून दत्तू मल्हारी केवारे हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. इतर बारा जागांवर झालेल्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर केलेल्या मतमोजणीत शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी आपले संस्थेवर निर्विवाद वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

शेतकरी विकास पॅनलला विजयी करून आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला आम्ही सदैव बांधील राहू. सर्व मतदार बांधवांसह सहकारी बांधवांचे आम्ही आभारी आहोत.
- हरिदास लोहकरे, जिल्हा परिषद सदस्य

आदिवासी कर्जदार खातेदार गटातून नामदेव हरी ठोकळ,  आनंदा ढवळू घोरपडे, जयराम वामन लोहकरे, गंगाराम लखा धोंगडे, यशवंत सखाराम करवंदे, नामदेव बाळू लांघे हे निवडून आले तर विरोधी परिवर्तन पॅनलचे रामा लक्ष्मण ठोकळ, चंदर लक्ष्मण जाधव, भगवंता शंकर बांबळे, पांडू वाळू ठोकळ, संपत निवृत्ती बांबळे हे पराभूत झाले. आदिवासी महिला राखीव गटातून शेतकरी विकास पॅनलच्या पर्वता गोविंद लोहकरे, अनुसया रामा गभाले ह्या निवडून आल्या तर परिवर्तन पॅनलच्या लंकाबाई विठ्ठल बांबळे व विठाबाई किसन ठोकळ ह्या पराभूत झाल्या. इतर मागास प्रवर्गातून शेतकरी विकासचे तुळशीराम तुकाराम केवारे हे निवडून आले तर परिवर्तनचे विश्वनाथ कोंडाजी लगड हे पराभूत झाले. अनुसूचित जाती जमाती गटातून शेतकरी विकासच्या अनुसया नाना केकरे ह्या निवडून आल्या. त्याच गटात भावराव नाना शिंदे हे पराभूत झाले. सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटात शेतकरी विकासच्या जिजाबाई मारुती लगड व महादू लखा केवारे हे निवडून आले तर परिवर्तनचे ज्ञानेश्वर लक्ष्मण लगड व संजय महादू लगड हे पराभूत झाले. पराभूत उमेदवारांमध्ये प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालिका विठाबाई ठोकळ, सरपंच साहेबराव बांबळे यांचे बंधू संपत बांबळे यांचा समावेश आहे  शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी टाकेद खुर्दचे सरपंच सचिन बांबळे, उपसरपंच कैलास पांडे, सामाजिक कार्यकर्ते बहिरू लगड, संतु घाणे, मायदराचे खंडू केवारे, ज्ञानेश्वर केवारे, वाळू बगड, उपसरपंच बहिरू केवारे, पोपट केकरे, सागर केवारे आदींनी परिश्रम घेतले

हा विजय मतदार बांधव आणि सर्व कार्यकर्त्यांचा आहे. शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी परिश्रम घेतलेल्या मतदार बांधव व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो.
– श्रीपत पाटील लगड, शेतकरी विकास पॅनल नेते

शेतकरी आणि सभासद बांधवांसाठी उत्तम काम करण्यासाठी सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकला. आमच्या विजयासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांचे आम्ही ऋणी आहोत. आगामी काळात नक्की चांगले काम करूया.
– यशवंत केवारे, माजी सरपंच मायदरा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!