इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण राजकारणातील अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती घेतले. महत्वपूर्ण असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या ताकदीमध्ये मोठी भर पडली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळा हा विजयाची नांदी मानला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी खासदार समीर भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला.
प्रवेश सोहळाप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, जिल्हा पदाधिकारी सुनील वाजे, गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव, नांदगाव बुद्रुकचे सरपंच देवा मोरे, कारभारीदादा नाठे, हिरामण नाठे उपस्थित होते. वाडीवऱ्हे ग्रामपालिकेचे उपसरपंच प्रवीण मालुंजकर, ग्रामपालिका सदस्य दिलीप मालुंजकर, रोहिदास टिळे, अशोक मोरे, माणिक मुतडक, गणपत शेजवळ, गणेश मालुंजकर, रवींद्र अस्वले,भरत महाले, महाराष्ट्र केसरी पै. मोहन कातोरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष खामकर, साकुरचे ग्रामपंचायत सदस्य अनिल उन्हवणे, साकुर सोसायटी संचालक कैलास सहाणे आदींनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत वाडीवऱ्हे गटासह संपूर्ण तालुक्यातील सत्ता राष्ट्रवादीच्या हातात येईल असा विश्वास ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले बळकटीकरण लाभले असल्याबाबत ना. छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.