भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ घाटनदेवी मंदिराचे पवित्र प्रांगण… सनई, चौघडी, वाजंत्री आणि मंगल वाद्यांचा निनाद… सदाबहार गीतांची रंगत..आली लग्नघटिका समीप नवरा…. सावधान …वाजंत्री सावधचित्त अशा अनेक मंगलाष्टकांची लयदार ललकारी… प्रतिष्ठित मान्यवरांचा आशीर्वाद आणि आयोजकांसह कार्यकर्त्यांची धावपळ… जेवणाची लज्जतदार मेजवानी… असा सगळा शाही सामुदायिक लग्नसोहळा पाहून वधुवरांच्या आईवडील, नातेवाईकांसह वऱ्हाडी मंडळींचे डोळे दिपले. […]
झगमगाटी विकासापेक्षा समृद्ध विकासाची मूल्ये प्रत्येकांत रुजवा – सीईओ लीना बनसोड : मोडाळेकरांनी इगतपुरीची मान देशात उंचावली – आमदार हिरामण खोसकर भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ आपलं गाव डोळ्यासमोर ठेवून नुसता चकचकीत विकास न करता सर्वांगीण विकास साधून समृद्ध विकासाची नवी मूल्य विकसित करावीत. आपल्या गावाचे विविध विषयांतील गुणपत्रक वाढवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. […]
लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा कोणत्याही संकटकालीन परिस्थितीला सामोरे जात अनंत अडचणींच्या उरावर बसून यशाचा राजमार्ग मिळवणे ही अजिबातच सोपी गोष्ट नाही. स्पर्धात्मक जीवनाशी दोन हात करतांना मनातले ध्येय उराशी बाळगून ते ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी आहे. यासह उत्तुंग स्वप्नांचे पूर्णत्व साध्य करतांना जनसेवेचा वारसा जपणे सुद्धा दिव्य असते. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतंर्गत केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असणाऱ्या शिरसाठे ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला. आज दुपारी संपूर्ण देशभरात स्वच्छ असणाऱ्या शिरसाठे ग्रामपंचायतीचे प्रसारण देशवासियांना पाहायला मिळाले. ग्रामसेवक हनुमान दराडे यांनी ह्या कार्यक्रमात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० छत्रपती शिवरायांचे विचार दगडालाही मोती बनवु शकतात. ह्या विचारांच्या सुसंस्कारांची पेरणी प्रत्येक माणसात व्हावी. शिवरायांच्या विचारांसह सामाजिक कार्याचा ठसा उमटवावा. यासाठी इगतपुरी तालुक्यातील रुपेश हरिश्चंद्र नाठे हा ध्येयवेडा युवक झपाटून काम करीत आहे. संपूर्ण कुटुंब आणि सहकारी मित्रांसह कामाला झोकून घेतलेल्या ह्या युवकाच्या प्रेरणादायी कार्याची दखल आशिया खंड स्तरावरील संघटनेने घेतली […]
गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मोडाळे गावाची उत्तुंग भरारी इगतपुरीनामा न्यूज, दि. १० भारत सरकारच्या वतीने देशपातळीवर दिला जाणारा मानाचा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार नाशिक जिल्ह्यात मोडाळे ग्रामपंचायतीला घोषित झाला आहे. 24 एप्रिलला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे […]
भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ पक्की जिद्ध, उच्च ध्येय आणि उच्चतम कार्य उभे करण्याचा ध्यास असेल तर कोणतीही गोष्ट असाध्य नसते. बिकट आर्थिक परिस्थिती, शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा, जाण्यायेण्याची भ्रांत अशा कितीही अडचणी असल्या तरी मनात असलेला दुर्दम्य आशावाद पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. सगळ्या परिस्थितीच्या छाताडावर बसून यशाला गवसणी घालणारे एक व्यक्तिमत्व इगतपुरी तालुक्यातील […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ आधीच अंध दिव्यांग असल्याने चुलीचा धूर डोळ्यांतून अश्रू आणतो. म्हणून ह्या परिवाराला मदत करणे आवश्यक आहे. म्हणून जागतिक महिला दिन आणि इगतपुरीनामा न्यूज पोर्टलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील अंध महिलेच्या कुटुंबाला गॅस कनेक्शन देण्यात आले. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, इगतपुरीचे वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, इगतपुरीनामाचे मुख्य संपादक भास्कर […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ कोरोनाचा खडतर काळ…ऑक्सिजनचा जीवघेणा तुटवडा..पेशंटच्या बेडचा अभाव…इंजेक्शन अन प्लाझ्माचे दुखणे… आणि जगण्यासाठी काय करायचे याची भ्रांत…!!! अशा बिकट काळात इगतपुरी तालुक्यासह इतरही भागाला जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या रूपाने खरा परमेश्वरी देवदूत लाभला. ह्या संकटकाळात जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणारे लोक […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनकडून दरवर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तिमत्वाला दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार जननायक गोरख बोडके यांना घोषित झाला आहे. गोरख बोडके हे सध्या नाशिक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम पाहत असून ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात अव्वल कामगिरी करून जनमानसात […]