दमदार, कसदार आणि दैदिप्यमान कार्यामुळे गोरख बोडके पुणे येथे कार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित : कोरोनाकाळात हजारो लोकांचे आशीर्वाद लाभले हाच माझा पुरस्कार : गोरख बोडके

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७

कोरोनाचा खडतर काळ…ऑक्सिजनचा जीवघेणा तुटवडा..पेशंटच्या बेडचा अभाव…इंजेक्शन अन प्लाझ्माचे दुखणे… आणि जगण्यासाठी काय करायचे याची भ्रांत…!!! अशा बिकट काळात इगतपुरी तालुक्यासह इतरही भागाला जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या रूपाने खरा परमेश्वरी देवदूत लाभला. ह्या संकटकाळात जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणारे लोक भयग्रस्त लोकांच्या चांगलेच लक्षात आले. असे असतानाही आजही जनमानसात गोरख बोडके ह्या देवदूताची क्रेझ मनामनात रुजलेली आहे. एवढ्यावरच न थांबता इगतपुरी तालुक्याला विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या विकासाच्या योजना यांच्यामुळेच साकारल्या. सांगायचे कारण एवढेच की, गोरख बोडके यांच्या अलौकिक कार्याचा गौरव खऱ्या अर्थाने होणे आवश्यक होते. आज पुणे येथे जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या कडून जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या दमदार आणि कसदार कामगिरीचा गौरव करण्यात आला.

कोविड काळात केलेली जनसेवा कामगिरी आणि सामाजिक कामात केलेला कार्याचा हिमालय याबद्धल त्यांना कार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. केंद्रीय पंचायत राज मंत्री ना. कपिल पाटील यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्यातील अनेक जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी गोरख बोडके यांचे दैदिप्यमान कार्य ऐकले असल्याचे सांगत अशा देवतुल्य व्यक्तिमत्वाला समक्ष पाहता आले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. इगतपुरीनामा न्यूजतर्फे गोरख बोडके यांचे हार्दिक अभिनंदन…!

कोणत्याही सन्मानासाठी, राजकारणासाठी आणि लौकीकासाठी मी कधीच सामाजिक काम केले नाही. माझ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी मला माझ्या शक्तीप्रमाणे सेवाकार्य करण्याची संधी परमेश्वराने दिली आहे. लोकांनी दिलेले शेकडो आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने मी अविरत जनसेवा करण्यास बांधील आहे.

- गोरख बोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य नाशिक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!