भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज “ओलें मूळ भेदी खडकाचें अंग | अभ्यासासी संग कार्यसिध्दी” ह्या अभंगाद्वारे असाध्य गोष्टी साध्य करण्यासाठी साधकांना मार्गदर्शन करतात. त्या अभंगाचा सारांश असा आहे की, दोऱ्याने दगडावर नित्य घर्षण केल्यास दगड कापला जाऊ शकतो. विष पचायला अत्यंत कठीण असते पण हेच विष सातत्याने थोडे थोडे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – इगतपुरी तालुक्यात मानवेढे येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आज संपन्न झाला. यानिमित्ताने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर या तालुक्यातील वारकरी भाविकांनी सहभाग घेतला. इगतपुरी तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील भाविकांनी सप्ताहात सहभाग घेतला. संपूर्ण साडेतीन दिवस चाललेल्या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मानवेढे ग्रामस्थांनी केले होते. यानिमित्ताने कानाच्या आजाराचे उपचार आणि […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – ग्रामीण भागात कुस्तीला मोठे महत्व आहे. पहिलवानांना कुस्त्यांच्या दंगलीची आस लागलेली असते. म्हणून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे जगदंबा मातेच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल अतिशय लोकप्रिय आहे. प्रचंड उपस्थितीत पार पडलेल्या या दंगलीत ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विजेत्या कुस्तीपटूंना रोख बक्षीस, ढाल आणि श्रीफळ देऊन ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत जगदंबा मातेच्या यात्रौत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराची रंगरंगोटी गावातील लष्करी जवानांच्या आर्थिक योगदानातून झाली असून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळी जगदंबा मातेची महापूजा करून यात्रेनिमित्त आई जगदंबा मुकुटाची शोभायात्रा काढण्यात आली […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – देशातील सर्व धर्मांतरित आदिवासींच्या शासकीय योजना व सवलती बंद कराव्या असा ठराव चिंचवड खोरीपाडा येथील धर्मसभेत एकमताने मांडण्यात आला. हभप काशिनाथ महाराज भोये ओझरखेड धाम यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतनानिमित्त 1008 महांडलेश्वर रघुनाथ देवबाप्पा फरशीवाले बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड खोरीपाडा येथे धर्म संसद व शाही मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील विविध […]
लेखन : भास्कर सोनवणे, संपादक महाराष्ट्राला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित ठेवण्याचे काम आधुनिक काळातील संतस्वरूप महात्मे करीत असतात. पांडुरंग परमात्म्याची सेवा करतांना तोच विठोबा प्रत्येक जीवामध्ये शोधण्याचे कसब सुद्धा ह्याच साधकांकडून होते. वाया जाऊ देऊ नये एक क्षण.. भक्तीचे लक्षण जाणावे हे याप्रमाणे जीवनातील प्रत्येक मिनिट हरिभक्ती करणारे विरळेच.. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे महामंडलेश्वर काशिनाथ महाराज यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रथमच आदिवासी परिसरात धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. 1008 महामंडलेश्वर रघुनाथ महाराज देवबाप्पा, हभप संदीपान महाराज अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 फेब्रुवारीला हा कार्यक्रम होत आहे. कैलास मठाचे संविधानंद सरस्वती महाराज, देवाची […]
शब्दांकन : पांडुरंग वारुंगसे, बेलगाव तऱ्हाळे नवसाला पावणारी, संकटी धावणारी आणि भक्तांना तारणारी आदिशक्ती श्री अंबिका माता ही बेलगाव तऱ्हाळे ग्रामस्थांची आराध्य देवता आहे, प्राचीन काळापासून भक्तांवर कृपाशीर्वादाची पखरण घालणाऱ्या या अंबिका मातेचा महिमा अगाध आहे. म्हणूनच बेलगाव आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्री अंबिका माता हे श्रद्धा स्थान आहे. तऱ्हाळ्या डोगराच्या कुशीत आणि दारणा माईच्या तीरावर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – महाराष्ट्राचे कुळदैवत खंडेराव महाराज यात्रेला येत्या माघ पोर्णिमेनिमित्त इगतपुरी तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान रामराव नगर येथील खंडेराव महाराज मंदिर येथे सुरवात झाली आहे. तालुक्यातील नवसाला पावणारा खंडोबा अशी ख्याती असलेले हे मंदिर आहे. याठिकाणी खंडेराव महाराज यांची यात्रोत्सव सुरू होत असून तीन दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४- मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी फाट्यापासून जवळच असणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिर येथे सालाबादप्रमाणे यावर्षी गणेशजयंतीनिमित्त उद्या बुधवारी जानेवारीला गणेश जयंती उत्सव सोहळा आणि यात्रा महोत्सव होणार आहे. सिद्धिविनायक महागणपती प्रतिष्ठानचे विश्वस्त संजय तुपसाखरे यांनी याबाबत माहिती दिली. उद्या पहाटे ६ वाजेपासून महागणेश याग, महायज्ञ व महापुजा, दुपारी १ वाजता […]