

इगतपुरीनामा न्यूज – शरद जयराम पाटील, रमेश चंद्र राजपती यादव आदींच्या सहाय्याने आनंदनगर मुंढेगाव येथे बांधलेल्या साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उद्या गुरुवारी दिवसभर पूजा आणि साई भंडारा होणार आहे. हे दुसरे वर्ष असून दरवर्षी येथे कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, महाराणा मित्र मंडळ, शिवगर्जना मित्र मंडळ, शिवसेना मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, मरी माता मित्र मंडळ, बालाजी मित्र मंडळ, नवचैतन्य मित्र मंडळ, क्रांती मित्र मंडळ, संताजी मित्र मंडळ, युवक मित्र मंडळ, शर्यती मित्र मंडळ, अचानक मित्र मंडळ यांनी केले आहे.