
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी, घोरपडेवाडी येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी गावातुन पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध देखावे सादर करण्यात आले. प्रवचनकार जागृती दर्णे यांचे प्रवचन झाले. सर्व भक्त मंडळींनी मंत्रमुग्ध होऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला. साधारण १५०० भक्त मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख शिवाजी सांगळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख हरीभाऊ हांडोरे, जिल्हा कर्नल लक्ष्मीकांत आडोळे, इगतपुरी तालुका.निरीक्षक राजेंद्र उदावंत, तालुकाध्यक्ष देवराम राक्षे, महिला अध्यक्ष मनीषा गतिर, मीना भोर, युवाप्रमुख नागेश भूसेकर, केशव तोकडे, भगवान घोरपडे, ज्ञानेश्वर पवार, गोकुळ आगीवले आणि सर्व तालुका सदस्य हजर होते.
