

इगतपुरीनामा न्यूज – परमेश्वर, गुरूंवर विश्वास ठेवल्यास विद्या, अखंड ज्ञान प्राप्त होते. यासाठी कठोर मेहनत आवश्यक आहे.आजचा बालक उद्याचा पालक असून शिबिराच्या माध्यमातून संस्काराची शिदोरी मिळत असते. बालसंस्कार शिबिरातुन आत्म विद्या प्राप्त होते. यातूनच नवी पिढी वारकरी संप्रदाय घडवतील असे प्रतिपादन हभप बाळासाहेब महाराज गतीर यांनी बेलगाव कुऱ्हे येथे छत्रपती शिवाजी महाराज बालसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रमात केले. हभप उत्तम महाराज गुळवे यांनी बालसंस्कार शिबिराचे अतिशय सुंदरपणे आयोजन केले होते. यानिमित्ताने मुलांना दहा दिवस वारकरी शिक्षणासह त्र्यंबकेश्वरला दर्शन घडवून तुळशीमाळ परिधान करण्यात आल्या. यावेळी कारभारी ठाणगे यांनी संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठाची पुस्तके वाटप केली. दहा दिवशीय बालसंस्कार शिबिरात गायन, वादन, पठण यात नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या मुलांना हभप बाळासाहेब महाराज गतीर, उत्तम महाराज गुळवे, नंदराज गुळवे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ वारकरी नथु बाबा गुळवे, सामाजिक कार्यकर्ते नंदराज गुळवे, कारभारी ठाणगे, भिवसेन गुळवे, शिवाजी गुळवे, तुकाराम गुळवे, युवक मंडळ बेलगाव कुऱ्हे, ग्रामस्थ उपस्थित होते.