इगतपुरीनामा न्यूज – दिव्यांग असूनही पंढरीनाथ महाराज सहाणे यांनी केलेल्या वारकरी सांप्रदायिक कार्याची दखल घेऊन अंधेरी येथील प्रभूनयन फाउंडेशन व श्री साई सहाय्य समिती इगतपुरी यांनी घेतली आहे. संस्थापकीय अध्यक्ष आनंद मवाणी, श्री साई सहाय्य समितीचे राजू देवळेकर यांच्या मार्गदशनाखाली त्यांना हार्मोनियम व तबला भेट देण्यात आला. पत्रकार लक्ष्मण सोनवणे, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना संपूर्ण वारकरी साहित्य देण्यात आले. दिव्यांग असूनही अनेक वर्षांपासून पंढरीनाथ महाराज सहाणे मुलांना विनामूल्य वारकरी शिक्षण देऊन त्यांनी शेकडो वारकरी घडविले आहेत. त्यांना आवश्यक मदतीसाठी पत्रकार लक्ष्मण सोनवणे, एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केला. प्रभूनयन फाउंडेशनने सहाणे यांचे वारकरी संप्रदायमधील कार्य पाहून त्यांना साहित्य मिळाल्याने त्यांनी आभार मानले. याप्रसंगी स्वानंद वारकरी संस्था बलायदुरीचे हभप विजय महाराज चव्हाण, पुंजाराम महाराज गाढवे यांनी पंढरीनाथ महाराज सहाणे यांच्या सुरू असलेल्या वारकरी कार्याची माहिती दिली.
यावेळी तानाजी सोनवणे, कचरू सहाणे, दिगंबर सहाणे, कारभारी सहाणे, बाळू शेळके, हरिभाऊ सहाणे, दत्तू शिंगाडे, गोपीनाथ भोर, बहिरु सहाणे, विष्णू सहाणे, यादव सहाणे, ईश्वर सहाणे, समाधान सहाणे, हरिभाऊ सहाणे, रावसाहेब महाराज, संजय महाराज सहाणे, भगवान महाराज सहाणे, सोमनाथ महाराज गायकवाड, शुभम महाराज सहाणे, सागर महाराज सहाणे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे, केरू सहाणे, दिलीप सहाणे, चेतन शिंगाडे, ज्ञानेश्वर मुरलीधर सहाणे, शिवाजी सहाणे, सुरेश सहाणे, पांडू कुकडे, रमेश सहाणे, गोपाळ सोनवणे, लुखा शिंगाडे, सखाराम सहाणे, हभप तानाजी वाकचौरे, शिवचरित्रकार प्रतीक्षा एकनाथ बोराडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सहाणे यांनी केले तर आभार भगवान सहाणे यांनी मानले.