गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे येथे शांतता समितीची बैठक संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – समाज जागृतीच्या हेतूने सुरू झालेल्या गणेशोत्सवाची परंपरा गणेश मंडळांनी ठेवत ठेवावी. नियमांचे तंतोतंत पालन करून उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नसून सामाजिक जबाबदारीने काम करावे असे आवाहन वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी केले. वाडीवऱ्हे येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. […]

नाशिकच्या घरामध्ये अवतरले वारली रामायण ; हरहुन्नरी आदिवासी कलाकार युवकाची अप्रतिम कलाकृती

किरण घायदार : इगतपुरीनामा न्यूज – प्रभू श्रीराम आणि रामायण हे प्रत्येक हिंदू माणसाच्या मनातील श्रद्धास्थान आहे. आदिवासी वारली चित्रशैलीत रामायणातील प्रसंग भाजपचे‌ नेते व प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या महात्मा नगरमधील नवीन वास्तूच्या दर्शनी भिंतीवर नुकतेच साकारण्यात आले आहेत. विक्रमगड येथील कृष्णा भुसारे या आदिवासी युवा चित्रकाराने वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ […]

पायी हळूहळू चाला..मुखाने नरेंद्रनाथ बोला !! – इगतपुरी ते कावनई जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज पायी दिंडी सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज –  इगतपुरी येथील राममंदिर ते कपिलधारा तीर्थ कावनई येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा पायी दिंडी आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी जनम प्रवचनकार बिपिन नेवासकर, मोहन महाराज कुलकर्णी यांनी गुरुमाऊली यांचा संदेश आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित भाविकांना समजून सांगितला. जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या कार्याची महती सांगून त्यांनी उपस्थितांना विविध प्रकारे मार्गदर्शन केले. ह्या सत्संगानिमित्त सकाळी […]

संजीवनी आश्रमशाळेत आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी आश्रमशाळेत आज आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेपासून पायी दिंडी काढत तळेगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिंचलेखैरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे […]

१६ वर्षांपासून वारकरी पताका खांद्यावर घेऊन आषाढी वारी करणारे पिंपळगाव डुकरा येथील उत्तमराव झनकर

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – “भेटी लागे जिवा लागलीसे आस” या अभंगा प्रमाणे विटेवर उभ्या असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची आस आषाढी एकादशीच्या निमित्ताने  सदैव वारकऱ्यांना लागलेली आहे. या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील वारकरी पताका खांद्यावर घेऊन माजी सरपंच उत्तमराव झनकर हे गेल्या १६ वर्षांपासून त्यांची पत्नी सौ. रंजना यांच्यासह पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत […]

तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, स्वप्नात सुद्धा कोणाचे वाईट चिंतू नका – बिपीन नेवासकर : वाडीवऱ्हे येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज सत्संग सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – ‘अज्ञानातून तरुन जायचं असेल तर साधूची संगतीच उपयुक्त ठरु शकते. साधु-संत हे आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जागे करणार्‍या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असं सांगताना तुकाराम महाराज काय सांगू आता संतांचे उपकार । मन निरंतर जागविती ॥ असे आपल्याला सांगतात. अत्यंत प्रेमळ संत आपल्याला क्षणोक्षणी सांभाळत, सावरत असतात. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. […]

उद्या गोंदे दुमाला येथील ग्रामदेवता भवानी माता यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील जागृत देवस्थान असलेले ग्रामदेवता भवानी माता जंगी यात्रोत्सवानिमित्त उद्या मंगळवारी २३ तारखेला  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविक व दुकानदारांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत गोंदे दुमाला आणि समस्त ग्रामस्थांनी केले आहे.  सकाळी ७ वाजता नवीन झेंडापूजन, ९ ते ११ मारुती मंदिरात होमहवन, ११ […]

धामणगाव येथे मंगळवारी १६ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताह

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे  रामनवमी व हनुमान जन्मोत्सत्व तथा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवानिमित्त मठाधिपती गुरुवर्य माधव बाबा घुले, वै. पोपट महाराज गाजरे यांच्या आशीर्वादाने मंगळवार १६ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला गायक, वादक, भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळीनी केले आहे. देवराम महाराज गायकवाड, जगदीश […]

लोहशिंगवे येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

इगतपुरीनामा न्यूज – विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्णमहोत्सव व जगदगुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. त्यानिमित्ताने नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या आशीर्वादाने, हभप पंढरीनाथ महाराज सहाणे, जगद्गुरू तुकाराम महाराज गुरुकुलचे हभप ज्ञानेश्वर महाराज तुपे यांच्या मार्गदर्शनाने उद्या मंगळवार ९ एप्रिल पासून अखंड […]

error: Content is protected !!