अस्वली स्टेशन येथे अंजनीनाथ महाराज पुण्यतिथीनिमित्त आजपासून तीन दिवसीय किर्तन महोत्सव

इगतपुरीनामा न्यूज – अस्वली स्टेशन येथील श्री ब्रम्हलीन अंजनीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त आज सोमवारी २७ पासून अखंड त्रयोदिनी किर्तन महोत्सव सोहळा होणार आहे. गुरुवर्य मठाधिपती हभप माधव महाराज घुले, किसन महाराज काजळे यांच्या आशीर्वादाने, हभप नामदेव महाराज डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ ते ६ काकडा भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरि किर्तन असे दैनंदिन कार्यक्रम आहेत. सोमवारी २७ ऑक्टोबरला हभप माधव महाराज काजळे, मंगळवारी हभप बाळकृष्ण महाराज बिन्नर, बुधवारी हभप प्रभाकर महाराज मुसळे यांचे हरिकीर्तन होईल. गुरुवारी ३० ऑक्टोबरला सकाळी ९ ते ११ वाजता हभप राजाराम महाराज मुसळे यांचे काल्याचे किर्तन होईल. या सप्ताहासाठी नांदुरवैद्य, बेलगाव कुऱ्हे, कुऱ्हेगाव, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख, जानोरी, नांदगाव बुद्रुक, साकुर भजनी मंडळ आदींचे सहकार्य लाभणार आहे. भाविकांनी या सप्ताहासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापक समस्त ग्रामस्थ अस्वली स्टेशल, नांदुरवैद्य व क्रांतीवीर भगतसिंग मित्र मंडळ, अस्वली स्टेशन यांनी केले आहे.

error: Content is protected !!