उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक १ श्री संग्राम गोविंदा पथकाकडून शांततामय वातावरणात दहीहंडी साजरी

इगतपुरीनामा न्यूज – उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक १ चे गोविंदा पथक म्हणून इगतपुरी तालुक्यातील टिटोली येथील श्री संग्राम गोविंदा पथक सुप्रसिद्ध आहे. ह्या गोविंदा पथकाकडून आज शांततामय वातावरणात दहीहंडी साजरी करण्यात आली. ह्या पथकातील एक गोविंदाचे गेल्या २ महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले. त्यामुळे यावर्षी पथकातील गोविंदा स्व. दिनेश उर्फ दामोदर ह्याला श्रद्धांजली म्हणून डीजेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने थर लावून श्रद्धांजली वाहत दुखवटा व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी संपूर्ण गोविंदा पथक भावुक झाले होते. मात्र दहीहंडीवर अतोनात प्रेम असलेले टिटोली गाव व तेथील ग्रामस्थ यांनी एकीचे महत्व ओळखले. भविष्यात चांगल्या गोष्टीचा पायंडा, मुलांवर चांगले संस्कार घडण्यासाठी आणि व्यसनमुक्त समाज घडण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून हा उत्सव साजरा करीत अनोखा संदेश लोकांना दिला.

error: Content is protected !!