इगतपुरीनामा न्यूज : आधार कार्ड धोरणांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बदलांमुळे आता नवीन आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी जन्म दाखला पुरावा जोडणे बंधनकारक आहे. जन्म दाखल्याशिवाय अन्य कुठलाही पुरावा यासाठी ग्राह्य मानला जात नाही. यापूर्वी जन्म दाखला नसला तरी केवळ रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रांच्या आधारे सुध्दा नवीन आधार कार्ड नोंदणी करणे शक्य होते, मात्र या वर्षी […]
इगतपुरीनामा न्यूज – विद्यार्थी जीवनात प्रामाणिक प्रयत्न आणि परिश्रम घेऊन ध्येय निश्चित केल्यास यश प्राप्त होते. गुणवत्तेला कार्यक्षमतेची जोड देऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज हितासाठी करावा. संघर्ष केल्याशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होणार नाही. पराजयात मोठ्या विजयाची नांदी लपलेली असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे हा जीवनाचा मुलमंत्र असला पाहीजे असे प्रतिपादन व्ही. एन. नाईक […]
निफाड :चंद्रकांत जगदाळे “छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यासाठी स्वराज्यची स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे खोळंबलेली सामान्य जनतेची कामे मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. येवला – लासलगाव मतदार संघातील पहिल्या स्वराज्य शाखेच्या फलकाचे अनावरण त्यांनी गोंदेगाव (ता.निफाड) येथे […]
इगतपुरीनामा न्यूज – मरण आणि तोरण प्रसंगात अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी,परंपरांमुळे समाजाचे प्रचंड नुकसान होते. दुःखद प्रसंगात विधवा महिलेला अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने महिलांचे खच्चीकरण व अपमान होतो. या चुकीच्या रूढी परंपरेमधून समाज मुक्त व्हावा यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड सातत्याने प्रयत्न करत आहे. याची सुरुवात धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथून करण्यात आली. प्रगतशील शेतकरी वसंतराव […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे. रात्री दहाच्या सुमारास बोरटेंभे येथील भानुदास नवले घरासमोरील अंगणात बिबट्या आला. ह्या बिबट्याला पाहून कुत्रे जोरात ओरडू लागल्याने नवले कुटुंबीयांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ घराचे पत्रे वाजवले असता बिबट्या पळून गेला मात्र पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बिबट्या […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जपत सामूहिक रक्षाबंधन साजरी केली. विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरा करता येत नाही म्हणून महिला प्राध्यापक व विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या विभागाला भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी राख्या बांधल्या. इगतपुरी रेल्वे पोलीस […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील राजमुद्रा सामाजिक शैक्षणिक मंडळातर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, होतकरू विद्यार्थ्यांसह सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हरी होम साई ढाबा संचालक अकबरशेठ पठाण यांच्या सौजन्याने व तरुणांचे आदर्श माजी अध्यक्ष संदीप नाठे व राजमुद्रातर्फे उद्या शनिवारी २६ ऑगस्टला हा कार्यक्रम […]
इगतपुरीनामा न्यूज – देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे या हजारो सैनिकांना भाऊ मानणाऱ्या टिटोली येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेतील चिमुकल्या बहिण भावांनी भेटकार्ड व राख्या सीमेवर पाठवल्या आहेत. ‘एक धागा शौर्याचा, एक राखी अभिमानाची’ या विचारांना अनुसरून टिटोली येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक […]
इगतपुरीनामा न्यूज – स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहाच्या वातावरणात टिटोली ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रम संपन्न झाले. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. टिटोली ग्रामपंचायतीने ग्रामनिधीचा सुयोग्य वापर करत ग्रामनिधीच्या १५ टक्के रक्कमेतून मागासवर्गीय कुटुंबांना आणि ५ टक्के रक्कमेतून दिव्यांगांना सोलर इन्व्हेटरचे वाटप केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी […]
इगतपुरीनामा न्यूज – रोजच्या दैंनदिन जीवनात प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर वाढत चालला आहे. प्लास्टिकच्या वाढत्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ नाशिक जनस्थान यांच्या वतीने इगतपुरी शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक जनस्थान ह्या सामाजिक […]