स्वातंत्र्यदिनी विविध विकास कामांचे उदघाटन, सोलर इन्व्हेटरचे वाटप : टिटोली ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमाला प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज – स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहाच्या वातावरणात टिटोली ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रम संपन्न झाले. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. टिटोली ग्रामपंचायतीने ग्रामनिधीचा सुयोग्य वापर करत ग्रामनिधीच्या १५ टक्के रक्कमेतून मागासवर्गीय कुटुंबांना आणि ५ टक्के रक्कमेतून दिव्यांगांना सोलर इन्व्हेटरचे वाटप केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नगर वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण आणि हनुमान मंदिरात वर्ग खोली ह्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वीही टिटोली ग्रामपंचायतने दिव्यांग तसेच मागासवर्गीयांना विशेष लाभ दिला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्ही ग्रामनिधीचा पुरेपूर योग्य वापर केला आहे. दिव्यांग व मागासवर्गीयांना सोलर इन्व्हेटरचा लाभ देण्यात आला. सर्वांच्या उत्कर्षासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे उपसरपंच अनिल भोपे ह्यांनी सांगितले. तहसीलदार अभिजित बावरकर यांनी ग्रामपंचायत टिटोली, उपसरपंच अनिल भोपे व सहकार्‍यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
इगतपुरी भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक भाबड, निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, श्रीसंग्राम सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचारी गणेश बोंडे व प्रवीण भटाटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाप्रसंगी दिव्यांग बांधव, मागासवर्गीय लाभार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!