प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक जनस्थानतर्फे भाजीविक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप

इगतपुरीनामा न्यूज – रोजच्या दैंनदिन जीवनात प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर वाढत चालला आहे. प्लास्टिकच्या वाढत्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ नाशिक जनस्थान यांच्या वतीने इगतपुरी शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक जनस्थान ह्या सामाजिक क्लब तर्फे भाजीपाला विक्रेत्यांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. ह्या प्रसंगाची दखल घेत शहरातील विविध नामवंत नागरिकांनी रोटरी क्लबचे कौतुक केले आहे. ह्या उपक्रमावेळी अध्यक्षा तन्मयी सौंदणकर, सचिव शंतनु सौंदणकर, माजी अध्यक्ष हरिकृष्ण कुलकर्णी, किरण शिंदे, दीपक जैस्वाल, अक्षय वाटेकर, शेजवळ बाबा तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि इतर सदस्य उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!