शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश : शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30ऑनलाईन शिक्षणासह सर्व बाबी पूर्ण झाल्याने शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी लिहलेल्या पत्रानंतर व फोनवरून चर्चा केल्यानंतर शिक्षण संचालक यांनी शुक्रवारी सायंकाळी शाळा, कॉलेजेसच्या मे महिन्याच्या सुट्टीबाबत परिपत्रक काढले आहे. वडिलांच्या निधनाने दुःखात असूनही शिक्षणमंत्री यांनी तातडीने या प्रस्तावाला मान्यता दिली, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली असून […]

टिचट्युबर्स फेसबुक समूहाकडून फोटो एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज दि. १८ : तंत्रस्नेही शिक्षकांना कायम मार्गदर्शन करणारा फेसबुक समूह म्हणून टीचट्युबर्स सुपरिचित आहे. समूहाकडून नेहमीच चांगल्या शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी महाराष्ट्रातील शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते. विशेषतः युट्युब व्हिडीओ संदर्भात समूहाकडून नेहमीच महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना फेसबुक समूह आणि विविध ऑनलाईन कार्यशाळा यामधून तांत्रिक मार्गदर्शन केले जात असते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज (दि. […]

कुणी रुग्णवाहिका देता का? तीस हजार लोकसंख्येसाठी एकच रुग्णवाहीका

इगतपुरीनामा न्यूज (शैलेश पुरोहित) दि. १४ : इगतपुरी नगरपरिषद हद्दीत गेल्या काही दिवसापासून रुग्णवाहिका व शववाहिका मिळत नसल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसह इतर रुग्णांचे देखील हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. इगतपुरी शहरातील ग्रामीण रूग्णालयात एकमेव रुग्णवाहिका आहे. इगतपुरी शहर व परिसरातील गावांची लोकसंख्या विचारात घेता ३० हजार नागरिकांना सध्या एकाच रुग्ण वाहिकेवर अवलंबून राहवे लागत […]

ब्रेकिंग न्यूज : दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली

शहरी भागासोबतच राज्याच्या ग्रामीण भागातही कोविडचा वाढता प्रभाव लक्षात घेता या महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, लवकरच परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर द्वारे दिली आहे. 📢 Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board […]

केपीजीच्या दिवंगत शिक्षकांच्या वारसांना आर्थिक साहाय्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. 8इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक पी. एस. फुलारे यांचे अपघाती निधन झाले.अतिशय गरीब व सामान्य परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीला प्रारंभ केला होता. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर फार मोठे दुःख निर्माण झाले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांनी […]

जनसेवा प्रतिष्ठान कडून निराधार व्यक्तीवर अंत्यसंस्कार

इगतपुरीनामा न्यूज दि. ५ : इगतपुरी शहरातील शिवाजी चौकात एक बेवारस व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. ही व्यक्ती निराधार असल्याने इगतपुरी शहरात गेले काही दिवस वावरत असल्याचे लक्षात आल्यावर ही व्यक्ती काही वर्षांपूर्वी इगतपुरी येथील गुरुद्वारा मध्ये सेवा देत असल्याचे निष्पन्न झाले. निराधार असल्याने या व्यक्तीचे अंत्यसंस्कार कुणी करायचे हा प्रश्न उभा राहिल्याने ‘जनसेवा प्रतिष्ठान’ने या […]

पहिली ते आठवीच्या परिक्षेसंदर्भात ‘ह्या’ निर्णयावर शिक्कामोर्तब

इगतपुरीनामा न्यूज दि. 3 : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात महत्वाची घोषणा केली असून पहिली ते आठवीच्या परीक्षा अखेर यंदापुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. गेले काही दिवस पालक, शिक्षक आणि शाळांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झालेला होता, शिक्षण मंत्र्यांच्या या घोषणेमुळे संभ्रम दूर झाला असून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची […]

फक्त पाचशे रुपयात होणार कोरोना टेस्ट

इगतपुरीनामा न्यूज (प्रतिनिधी) इगतपुरी दि. १ : नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना राज्य सरकारने कोरोना चाचणीच्या दरात कपात करून सामान्य माणसाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.याआधी कोरोना चाचणी साठी सातशे रुपये आकारले जात होते मात्र नव्या दरानुसार आता पाचशे रुपये आकारले जाणार आहेत. सर्व प्रकारच्या खाजगी लॅबला हे नवीन दर […]

वेळुंजे जिल्हा परिषद शाळेचे रूप पालटणार : एसएनएस फाउंडेशन कडून चाळीस लाख रुपयांची मदत

इगतपुरीनामा न्यूज (प्रतिनिधी) : त्र्यंबकेश्वर दि. ३१ : तालुक्यातील वेळुंजे जि प शाळेच्या पन्नास लाख रुपये किंमतीच्या तीन वर्ग खोल्या व मुलामुलींकरिता स्वतंत्र शौचालय युनिटचे भूमीपूजन शिवसेना तालुका समन्वयक तथा शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष समाधान बोडके-पाटील, एसएनएस फाउंडेशनचे प्लांट मॅनेजर प्रसन्न हलगी व समन्वयक राम बडगुजर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून करण्यात आले. […]

तुकाराम बीज निमित्त घोटी शहरात संत तुकारामांना अभिवादन

इगतपुरीनामा न्यूज (प्रतिनिधी) : घोटी दि. ३१ : इगतपुरी तालुक्यात जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांना घातलेली बंदी यामुळे नियमांचे पालन करीत घोटी शहरात श्रीसंत तुकाराम महाराज बीज अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. घोटीतील मारुती मंदिरात संत […]

error: Content is protected !!