कुणी रुग्णवाहिका देता का? तीस हजार लोकसंख्येसाठी एकच रुग्णवाहीका

इगतपुरीनामा न्यूज (शैलेश पुरोहित) दि. १४ :

इगतपुरी नगरपरिषद हद्दीत गेल्या काही दिवसापासून रुग्णवाहिका व शववाहिका मिळत नसल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसह इतर रुग्णांचे देखील हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. इगतपुरी शहरातील ग्रामीण रूग्णालयात एकमेव रुग्णवाहिका आहे. इगतपुरी शहर व परिसरातील गावांची लोकसंख्या विचारात घेता ३० हजार नागरिकांना सध्या एकाच रुग्ण वाहिकेवर अवलंबून राहवे लागत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. शासनाच्या १०८ रुग्णवाहिका देखील व्यस्त असल्यामुळे ,रुग्णांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. लोकसंख्येचा विचार करता इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात एकूण २ रुग्णवाहिका व १ शववाहिका असणे अत्यंत आवश्यक आहे.
या मुद्यांवरून मागील वर्षी इगतपुरी चे आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे पाहणी दौऱ्यादरम्यान येथील स्थिती व समस्या जाणून घेत १ रुग्णवाहिका व शववाहीका लवकरात लवकर मिळून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांचे आश्वासन हवेतच विरल्याचे चित्र दिसत आहे. रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णांना नाशिक येथे उपचारासाठी नेण्यासाठी मोठी दमछाक करावी लागत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!