इगतपुरीनामा न्यूज (प्रतिनिधी) :
घोटी दि. ३१ : इगतपुरी तालुक्यात जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांना घातलेली बंदी यामुळे नियमांचे पालन करीत घोटी शहरात श्रीसंत तुकाराम महाराज बीज अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. घोटीतील मारुती मंदिरात संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गाथा ग्रंथाचेही पूजन करण्यात आले. यावेळी भजन व अभंगांचे चिंतन करीत नामस्मरण करण्यात आले.
” विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्म ! भेदाभेद भ्रम अमंगळ !! ” असे म्हणत जगाला समता, शांतीचा व विवेकाचा संदेश देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज! संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन अर्थात तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा केला जातो. घोटीतील मारुती मंदिरात झालेल्या या पूजन सोहळ्यापसंगी प्रसाद वाटप करण्यात आला. माजी आमदार शिवराम झोले, निवृत्ती जाधव, ह भ प मोहन महाराज भगत, सरपंच रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, यांच्यासह सुनील जाधव, रामदास शेलार, बाळासाहेब सोनार, सुरेश कडू, संपतराव म्हसने, पांडुरंग लोहार, निवृत्ती खत्री, उद्धव हांडे, सखाराम जाधव, प्रभाकर जाधव, गणेश काळे, भगीरथ तोकडे, बाळासाहेब जाधव, शंकरराव कडवे, अशोक गोरडे, तुषार महाराज खातळे, तुषार भन्साळी आदी सहभागी उपस्थित होते.