वेळुंजे जिल्हा परिषद शाळेचे रूप पालटणार : एसएनएस फाउंडेशन कडून चाळीस लाख रुपयांची मदत

इगतपुरीनामा न्यूज (प्रतिनिधी) :

त्र्यंबकेश्वर दि. ३१ : तालुक्यातील वेळुंजे जि प शाळेच्या पन्नास लाख रुपये किंमतीच्या तीन वर्ग खोल्या व मुलामुलींकरिता स्वतंत्र शौचालय युनिटचे भूमीपूजन शिवसेना तालुका समन्वयक तथा शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष समाधान बोडके-पाटील, एसएनएस फाउंडेशनचे प्लांट मॅनेजर प्रसन्न हलगी व समन्वयक राम बडगुजर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच नानासाहेब उघडे होते. केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत दहा लाख रुपये आणि एसएनएस फाऊंडेशनच्या माध्यमातून चाळीस लाख रुपये असा एकूण पन्नास लाख रुपये निधी शाळेच्या वर्गखोल्या व शौचालय युनिट करिता मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान बोडके- पाटील यांनी शाळेत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अध्यापनाबरोबरच भविष्यात वेळुंजे शाळा ही जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाची जिल्हा परिषदेची शाळा एसएनएस फाऊंडेशन व शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करून बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी एसएनएस फाउंडेशनचे प्लांट मॅनेजर प्रसन्न हलगी, बडगुजर, गणेश, कॉन्ट्रॅक्टर विजय सोनवणे, शिवसेना नेते समाधान बोडके-पाटील, सरपंच नानासाहेब उघडे, उपसरपंच राजुभाऊ बोडके, ग्रामसेविका श्रीम.योगिता पुंड, शा.व्य. समिती उपाध्यक्ष भाऊसाहेब काशिद, सदस्य वसंत बोडके, सोमनाथ उघडे, मुख्याध्यापक कैलास सोनवणे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. एसएनएस फाउंडेशनचे श्री.पुराणिक, श्रीम.चौधरी, नामदेव खोडे आदी उपस्थिती होते.
सूत्रसंचालन आदर्श शिक्षक नामदेव बेलदार यांनी तर आभार मुख्याध्यापक कैलास सोनवणे यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!