टिचट्युबर्स फेसबुक समूहाकडून फोटो एडिटिंग कार्यशाळेचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज दि. १८ : तंत्रस्नेही शिक्षकांना कायम मार्गदर्शन करणारा फेसबुक समूह म्हणून टीचट्युबर्स सुपरिचित आहे. समूहाकडून नेहमीच चांगल्या शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी महाराष्ट्रातील शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते. विशेषतः युट्युब व्हिडीओ संदर्भात समूहाकडून नेहमीच महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना फेसबुक समूह आणि विविध ऑनलाईन कार्यशाळा यामधून तांत्रिक मार्गदर्शन केले जात असते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज (दि. १८) मोबाईल फोटो एडिटिंग या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून नांदेड येथील सुप्रसिद्ध टेक्निकल गुरू श्याम कापसे हे या कार्यशाळेत महाराष्ट्रातील शिक्षकांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.
टिचट्युबर्स फेसबुक समूह आणि ‘टेक्नो आनंद ज्ञान संजीवनी नेटवर्क‘ च्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मोबाईल फोटो एडिटिंग संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बंधू भगिनी उत्तम दर्जाचे ऑनलाईन शैक्षणिक साहित्य तयार करत असतात. हे करत असतांना त्यांना कमीत कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त दर्जेदार साहित्य निर्मिती कशी करता येईल यावर टिचट्युबर्स फेसबुक समूह आणि टेक्नो आनंद ज्ञान संजीवनी नेटवर्क नेहमीच मार्गदर्शन करत असतात. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज (दि. १८) संध्याकाळी पाच ते सात या वेळेत या वेळेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर जिल्हा परिषदेचे सुप्रसिद्ध तंत्रस्नेही शिक्षक आनंद आनेमवाड हे या कार्यशाळेसाठी संवादक म्हणून काम पाहणार आहेत.

कार्यशाळेचे लाईव्ह प्रक्षेपण युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून केले जाणार असून फेसबुक वर टिचट्युबर्स समूह जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.