पहिली ते आठवीच्या परिक्षेसंदर्भात ‘ह्या’ निर्णयावर शिक्कामोर्तब

इगतपुरीनामा न्यूज दि. 3 :

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात महत्वाची घोषणा केली असून पहिली ते आठवीच्या परीक्षा अखेर यंदापुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. गेले काही दिवस पालक, शिक्षक आणि शाळांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झालेला होता, शिक्षण मंत्र्यांच्या या घोषणेमुळे संभ्रम दूर झाला असून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा यंदा होणार नाही हे नक्की झाले आहे.

खुद्द शिक्षणमंत्र्यांनी ट्विटर वरून या निर्णयाची घोषणा केली असून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोविडमुळे जवळपास वर्षभरापासून शाळा बंद आहेत. काही शाळांमध्ये ऑनलाईन तर काही शाळांमध्ये ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सध्या सुरू आहे. कोविडचा संसर्ग कमी होऊन सगळे सुरळीत होईल आणि यंदा परीक्षा सुरळीत पार पडतील अशी आशा मध्यंतरी निर्माण झाली होती, मात्र मार्च पासून पुन्हा कोविड संसर्ग वाढायला सुरुवात झाल्याने सगळेच बॅकफुटवर गेले होते. या परिस्थितीचा विचार करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आता पहिली ते आठवीचे विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार हे निश्चित झाले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!