ब्रेकिंग न्यूज : दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली

शहरी भागासोबतच राज्याच्या ग्रामीण भागातही कोविडचा वाढता प्रभाव लक्षात घेता या महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, लवकरच परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.