केपीजीच्या दिवंगत शिक्षकांच्या वारसांना आर्थिक साहाय्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. 8
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक पी. एस. फुलारे यांचे अपघाती निधन झाले.अतिशय गरीब व सामान्य परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीला प्रारंभ केला होता. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर फार मोठे दुःख निर्माण झाले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांनी स्वेच्छेने मदत करण्याचे ठरविले. 41 हजार 400 रुपयांचा निधी जमा केला. हा मदतनिधी त्यांच्या पत्नी सविता प्रकाश फुलारे व कुटुंबियांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांच्या उपस्थितीत देण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या मदतीमुळे फुलारे कुटुबियांना मोठा आधार मिळाला.

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    प्रा . देविदास गिरी says:

    बातमी छान आली .आभार आणि खूप खूप धन्यवाद .

  2. avatar
    प्रा . देविदास गिरी says:

    सामाजिक बांधिलकीची शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बातमी .

Leave a Reply

error: Content is protected !!