८ हजार फळझाडे लावून संगोपनाचा घेतला वसा ; वाचून बघा शिरसाठे गावाचा इतिहास असा : पर्यावरणपूरक कामांमध्ये शिरसाठे ग्रामपंचायतीने केले दैदिप्यमान कार्य

पर्यावरणपूरक शिरसाठे गावाची यशोगाथा १ भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे हे १ हजार २८० पेक्षा अधिक लोकसंख्या व 255 घरे असलेले पर्यावरण पूरक गांव आहे. गावाला गायरान मुबलक असलेली गायरान जमीन किमान ५० वर्षापासून गुरे चराईसाठी वापरण्यात येत होती. ह्या जमिनीमध्ये आजूबाजूचे शेतकरी बांध कोरून अतिक्रमण करत होते. अशा ओसाड […]

गडकिल्ल्यांसह स्वराज्याच्या अस्तित्वाला नवा झंकार देण्याची धडपड : घोटीच्या कळसुबाई मित्रमंडळाकडून रतनगडावर शिवजयंती

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे अस्तित्व चिरंतन टिकून स्वराज्य अबाधित राहावे.  ही स्थळे नष्ट झाली तर भविष्यात चित्रातच गडकिल्ले दाखवावे लागतील. म्हणून घोटी येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक प्रयत्नशील असतात. गेल्या २५ वर्षांपासून नेहमीच गडकिल्ले प्रकाशझोतात राहावे, त्यांचे महत्त्व जनसामान्यांना समजावे यासाठी सातत्याने धडपड करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा […]

अज्ञातांनी लावलेल्या आगीमुळे घोटीच्या डोंगरावरील शेकडो झाडे भस्मसात : कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची धरणीमाता फाउंडेशनची मागणी

सुनील शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या घोटीतील धरणीमाता वृक्ष संगोपन फाउंडेशनने घोटीजवळील डोंगरावर लागवड केलेल्या तब्बल शेकडो वृक्ष अज्ञात व्यक्तीने डोंगराला लावलेल्या आगीत खाक झाले. यामुळे वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या डोंगराला आग लावू नये यासाठी शासनस्तरावरून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी धरणमाता वृक्षसंवर्धन फाउंडेशनने […]

सर्वोच्च कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी रोपवे निर्मित करण्यासाठी हालचाली सुरू : स्थानिकांच्या समृद्धीसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ इगतपुरी तालुक्याच्या हद्दीवरील कळसुबाई हे सर्वोच्च शिखर असून वर्षभर ह्या ठिकाणी हजारो पर्यटक भेटी देत असतात. ह्यामुळे इगतपुरी तालुक्यासह कळसुबाई परीसरातील अनेक लोकांना रोजगार मिळतो. ह्या शिखरावर जाण्यासाठी रोपवे व्हावा अशी राज्यातील अनेक पर्यटकांची मागणी आहे. त्यानुसार अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचाही पाठपुरावा सुरू असतो. राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली […]

युवराजराजे भोसले, नामवंत बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांच्याकडून होणार इगतपुरी तालुक्यात कायापालट होणारी कामे : गोरख बोडके यांच्याकडून पर्यटन आणि विकासासाठी घेणार तांत्रिक साहाय्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० इगतपुरी तालुका म्हणजे मुक्तहस्ते खुणावणारे निसर्गसौंदर्य असणारा लाडका तालुका आहे. ह्या तालुक्यातील निसर्गाने सर्वानाच मोहिनी घातली आहे. यामुळेच ह्या तालुक्यात पर्यटनवृद्धी आणि भरभराट आणण्याची महत्वाकांक्षी इच्छा पूर्णत्वाला जाणार आहे. छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांचे चिरंजीव युवराजराजे भोसले यांच्यासह नासिकचे नामवंत बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांनी इगतपुरी तालुक्याला पर्यटन क्षेत्रात अव्वल करण्यासाठी […]

अहो आश्चर्यम्…! : चक्क २९०० फूट उंचीच्या त्रिंगलवाडी किल्ल्यावर १ हजार किलोचा वजनदार दरवाजा नेला वाहून : किल्ले त्रिंगलवाडी प्रवेशद्वाराचा बुरुजार्पण सोहळा होणार 19 डिसेंबरला

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ इगतपुरी तालुक्यातील ऐतिहासिक आणि गिर्यारोहकांना प्रिय असणाऱ्या त्रिंगलवाडी किल्ल्याला संरक्षक स्वरूप देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक व सह्याद्री प्रतिष्ठान, शहापूर, सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि इगतपुरी तालुक्यातील दुर्गप्रेमी युवक झपाटून गेले आहेत. हा किल्ला २ हजार ९०० फूट उंच असून चढाईला अतिशय खडतर आहे. मात्र एवढ्या मोठ्या उंचीवर 1 हजार किलो वजनाचा सागवानी […]

पाडळी रेल्वेस्थानकात तिकीटगृह व प्रतिक्षागृहाची सुविधा देण्याची मागणी : उपसरपंच बाळासाहेब आमले यांचे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज (प्रभाकर आवारी, मुकणे) दि. १२ : इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील प्रवाशांना व कामगारांना राष्ट्रीय महामार्ग व गोंदे औद्योगिक वसाहत जवळ असल्याने सोयीचे व अधिक वर्दळ असणाऱ्या पाडळी रेल्वेस्थानकाची सुधारणा करून तिकीटगृह व प्रवासी प्रतिक्षागृहाची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच इतर काही जलद गाड्यांनाही येथे थांबा मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांच्याकडे पाडळी […]

बोर्ली भागात पर्यटनवृद्धीसाठी विविध विकासकामे आणि स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी पर्यटनमंत्र्यांशी भेट : उपसरपंच गोविंद भले यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ बोर्ली गावचा समावेश पर्यटन क्षेत्रात होऊन या ठिकाणी विविध सुविधा व विकासकामे व्हावीत. तरुणांना रोजगार मिळावा. गाव परिसर विकास होऊन येथील श्री संतोबा देवस्थान विकसित व्हावे अशी मागणी बोर्लीचे उपसरपंच गोविंद भले यांनी राज्याचे पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. संगमनेर कोळीवाडा येथील दंडकारण्य अभियान आनंद मेळावा या ठिकाणी भेट […]

कळसुबाई मित्र मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष : कळसुबाई मातेच्या घट कलशाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पूजन

भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहकांच्या रौप्यमहोत्सवी कार्याचे ना. पवार यांनी केले कौतुक वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाकडून महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर अखंडीतपणे गेल्या २५ वर्षांपासून नवरात्रोत्सवात घटस्थापना करण्यात येते. रोज विधिवत पूजन करून कळसुबाई मातेची आरती केली जाते. शिखरावर मंदिराच्या परिसरात साफसफाई केली जाते. याच कार्याची दखल घेत राज्याचे […]

महिमा देवीचा.. नवसाला पावणारी घाटनदेवी

इगतपुरीनामा न्यूज, ता. ०७ : निसर्गसौंदर्याने नटलेल्या इगतपुरी शहरालगत घाटनदेवी मातेचे मंदिर आहे. इगतपुरी शहर सोडल्यानंतर कसारा घाटाच्या प्रारंभीच घाटनदेवी मातेचे शिवकालीन प्राचीन मंदिर आहे. घाटात देवीचे स्थान असल्याने घाटनदेवी माता म्हणून हे स्थळ प्रसिद्ध झाले आहे. घाटनदेवीचे रूप अत्यंत विराट आहे. संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी व नवसाला पावणारी म्हणून तिचा महिमा आहे. घाटनदेवी मातेच्या […]

error: Content is protected !!