भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहकांच्या रौप्यमहोत्सवी कार्याचे ना. पवार यांनी केले कौतुक
वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाकडून महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर अखंडीतपणे गेल्या २५ वर्षांपासून नवरात्रोत्सवात घटस्थापना करण्यात येते. रोज विधिवत पूजन करून कळसुबाई मातेची आरती केली जाते. शिखरावर मंदिराच्या परिसरात साफसफाई केली जाते. याच कार्याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला घटकलशाचे पूजन केले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्याकडे घटकलश सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंडळाचे संस्थापक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखालील रौप्यमहोत्सवी कार्याला शुभेच्छा देऊन गिर्यारोहकांच्या कार्याचे कौतुक केले.
आज घटस्थापनेच्या दिवशी मंडळाच्या गिर्यारोहकांनी कळसुबाई मंदिराला फुलांच्या माळांनी सजावट केली. वाजत गाजत घट कलशाचे पूजन व कळसुबाई मातेची आरती करून मोठ्या उत्साहात शिखरावर घटस्थापना केली. कोरोना नावाच्या राक्षसाचा समूळ नाश मातेनी करावा असे साकडे मातेच्या चरणी गिर्यारोहकांनी केले. यावेळी कोरोना संबंधित सर्व नियम पाळण्यात आले. या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, गजानन चव्हाण, बाळासाहेब आरोटे, पुरुषोत्तम राठोड, हरिश्चंद्र चव्हाण, प्रवीण भटाटे, काळू भोर, प्रशांत येवलेकर, नितीन भागवत, ज्ञानेश्वर मांडे, विकास जाधव, बाळासाहेब वाजे, निलेश पवार, पंढरीनाथ दुर्गुडे, सोमनाथ भगत, उमेश दिवाकर, गणेश काळे, निलेश आंबेडकर, आदेश भगत, एकनाथ शिंदे, सुरेश चव्हाण, संतोष म्हसणे, बबलू बोराडे, निलेश बोराडे, मयूर मराडे, भगवान तोकडे, चेतन छत्रे, संकेत वाडेकर यांच्यासह इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.