गडकिल्ल्यांसह स्वराज्याच्या अस्तित्वाला नवा झंकार देण्याची धडपड : घोटीच्या कळसुबाई मित्रमंडळाकडून रतनगडावर शिवजयंती

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे अस्तित्व चिरंतन टिकून स्वराज्य अबाधित राहावे.  ही स्थळे नष्ट झाली तर भविष्यात चित्रातच गडकिल्ले दाखवावे लागतील. म्हणून घोटी येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक प्रयत्नशील असतात. गेल्या २५ वर्षांपासून नेहमीच गडकिल्ले प्रकाशझोतात राहावे, त्यांचे महत्त्व जनसामान्यांना समजावे यासाठी सातत्याने धडपड करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर आणि मृत्यू रायगडावर झाला होता. महाराजांनी याच गडकिल्ल्यांच्या व सह्याद्रीच्या मदतीने स्वराज्य उभारले होते. या गडकिल्ल्यांचे महत्त्व सर्वांनाच समजावे म्हणुनच कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे आघाडीवर असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे गिर्यारोहक दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर साजरी करतात. यावेळी डिजिटल बोर्ड, डीजे, रासायनिक रंग, फटाके आदी वायफळ खर्चाला फाटा देण्यात आला. मोठ्या उत्साहाच्या वातावरणात अकोले तालुक्यातील प्रसिद्ध रतनगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी युवतींनी पारंपरिक पद्धतीचा पेहराव परिधान करून बालशिवाजीचे पूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने रतनगड परिसर दुमदुमून गेला होता. या स्तुत्य उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगिरथ मराडे, गजानन चव्हाण, बाळासाहेब आरोटे, गणेश काळे, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, दीपक मराडे, संतोष म्हसणे, काळू भोर, ज्ञानेश्वर मांडे, संजय जाधव, निलेश पवार, गोकुळ चव्हाण, नितीन भागवत, रोशन लहाने, संकेत वाडेकर, अवधूत दिवटे, साहिल तुंबारे, पांडुरंग भोर, धनंजय बोराडे, सायरा खलिफा, नगमा खलिफा, साक्षी आरोटे, जान्हवी भोर, गायत्री मराडे, ऋषिकेश बाणाईत, राहुल हांडे, भगवान तोकडे, सोमनाथ भगत, रमेश हेमके, रुद्रेश हेमके आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!