इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
इगतपुरी तालुका म्हणजे मुक्तहस्ते खुणावणारे निसर्गसौंदर्य असणारा लाडका तालुका आहे. ह्या तालुक्यातील निसर्गाने सर्वानाच मोहिनी घातली आहे. यामुळेच ह्या तालुक्यात पर्यटनवृद्धी आणि भरभराट आणण्याची महत्वाकांक्षी इच्छा पूर्णत्वाला जाणार आहे. छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांचे चिरंजीव युवराजराजे भोसले यांच्यासह नासिकचे नामवंत बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांनी इगतपुरी तालुक्याला पर्यटन क्षेत्रात अव्वल करण्यासाठी विविध प्रकारे नियोजन केले आहे. यासंदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्याशी त्यांनी विशेष चर्चा करून ह्या तालुक्यासाठी आगळे व्यवस्थापन केले आहे.
छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांचे चिरंजीव युवराजराजे भोसले, नासिकचे नामवंत बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांनी इगतपुरी तालुक्यात आज भेट दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी इगतपुरी तालुक्याच्या विविध विकासाबाबत सर्वांगीण चर्चा करण्यात आली. इगतपुरी तालुका पर्यटन क्षेत्रात असल्याने ह्या तालुक्यात कौशल्याने नियोजन करून स्थानिकांना रोजगार आणि पर्यटकांना सोयीसुविधा करण्यासह विकासाची विविध कामे उभी करू असा शब्द युवराजराजे भोसले आणि दीपक चंदे यांनी दिला. गोरख बोडके यांनी त्यांना इगतपुरी तालुक्याच्या स्थितीबाबत परिपूर्ण माहिती देऊन ह्या तालुक्याला राज्याच्या नकाशावर झळकवण्यासाठी देत असलेल्या साहाय्याबाबत ऋण व्यक्त केले. छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांचे चिरंजीव युवराजराजे भोसले, नासिकचे नामवंत बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांनी आमचा सर्वाधिक आवडीचा तालुका इगतपुरी असल्याचे सांगत कर्मभूमीला नेहमीच मदत करू असे सांगितले.