
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी रुग्णालयाचे तत्कालीन अधिकारी देवतुल्य व्यक्तिमत्व स्व. डॉ. प्रदीप केशवराव नाईक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त इगतपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते शाम चव्हाण, धिरज परदेशी तुषार शिंदे यांनी प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. डॉक्टरांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित त्यांच्या पत्नी पद्मजा नाईक व त्यांच्या दोन मुलांनी समाधान वृद्धाश्रम इचलकरंजी येथे मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. डॉ पद्मजा नाईक, डॉ. महेश जाधव यांनी रुग्णांची तपासणी करून वैद्यकीय उपचार केले. नवचैतन्य बालगृह येथील अनाथ बालकांना अन्नदान केले. स्व डॉ. प्रदीप नाईक यांनी घेतलेली रुग्णसेवा आणि मानवसेवेची ज्योत अखंड तेवत राहील अशी भावना डॉ. पद्मजा नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. प्रदीप नाईक यांनी धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे मुख्य प्रशासकिय अधिकारी पदावर असताना असंख्य गोरगरीब रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करून महाराष्ट्रभर गोरगरीब रुग्णांचा देवदूत म्हणून आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या अचानक जाण्याने वैद्यकीय क्षेत्रातील कधी न भरणारी पोकळी निर्माण झाली असून गोरगरीब नागरिकांचा आरोग्यरुपी देवदूत हरपला. ह्या देवदूताने आपले पूर्ण जीवन रुग्णसेवेसाठी समर्पित केले अशी भावना इगतपुरीचे डॉ. महेश जाधव यांनी व्यक्त केली.