
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे डॉ. त्र्यंबक काळूजी शेंडगे हे व्यक्तिमत्व म्हणजे जनसेवेचे सेवाव्रती व्यक्तिमत्व. ग्रामीण भागातील कसाही थंडी तापाचा रुग्ण असो दादांकडे तो आल्यावर लगेच बरा व्हायचा. त्यांच्याकडे कोणताही रुग्ण आला की ठणठणीत झाल्याशिवाय राहत नव्हता. दादांमुळे आम्हालाही कधी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासली नाही. मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव या ठिकाणी वैद्यकीय सेवा देताना कुठलाही आर्थिक व्यवसाय बघितला नाही. अनेक रुग्णांना मोफत सेवा देण्याचे काम तुम्ही तीस वर्षे केले आहे. आणि आज तुम्ही आमचा अचानक निरोप घेऊन अगदी मनाला चटका लावून गेले आहात. तुम्ही तुमच्या जाण्याची उणीव आम्हाला कायम भासत राहणार आहे. कुशेगाव सारख्या आदिवासी भागात तुम्ही सेवा देताना अगदी मोफत सेवा देऊन तेथील अनेक रुग्णांचे प्राण वाचवले होते. तुमच्यासारखे दैवी व्यक्तिमत्व होणे नाही. आपल्याला इगतपुरी तालुक्याच्या वतीने भावपूर्ण आदरांजली…!
– विकास त्र्यंबक शेंडगे, पत्रकार