इगतपुरीनामा न्यूज, दि. 31
गेल्या आठवड्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते पडघा दरम्यान रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणी झाल्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा १ नोव्हेंबरपासून टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तेव्हापासून कार्यालयाकडून सातत्याने रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा सुरु होता. दैनदिन झालेल्या कामाचा आढावा घेण्यात येत होता. आज पदाधिकाऱ्यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर आज पुन्हा भुजबळ फार्म येथील अधिकाऱ्यांसमवेत कामाचा आढावा घेतला. त्यात फक्त पिक ईन्फ्रा या कंपनीनेच रस्याचे काम पूर्ण केले त्याबद्दल त्याचे कौतूक केले. यावेळी नॅशनल हायवे प्राधिकरणचे प्रकल्प संचालक साळुंखे, पिक इन्फ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, जिल्हा नियोजन समितीचे गोरख बोडके, उद्योजक मनीष रावत उपस्थित होते.