दोन अपघात – १ ठार, ७ जखमी ; नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेकडून अपघातग्रस्त जखमींना मिळाले जीवदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. 7

मुंबई आग्रा महामार्ग आणि अपघात हे समीकरण आता लोकांना माहित झाले आहे. आज महामार्गावर 2 अपघात झाले. पहिला अपघात कसारा घाटात झाला. मोटारसायकल दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात मागून येणाऱ्या आयशरच्याखाली राजेश मारू रा. इगतपुरी हे जागीच ठार तर कपिल मुतडक हे गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले.

दुसरा अपघात वाडीवऱ्हे फाट्याजवळ झाला. नासिकहुन मुंबईकडे जाणारी इर्टिगा गाडी दुभाजक तोडून नाशिककडे जाणाऱ्या पिकअप गाडीवर गेल्याने त्यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये पिकअप चालक रफिक तुराब शेख वय 47, प्रवासी यमुनाबाई बाबुराव वाकचौरे 55, समृद्धी नवनाथ वाकचौरे वय 13 रा. इगतपुरी, प्रतिभा गणेश नेहेते वय 48, गणेश दामू नेहते वय 54, चैतन्य गणेश नेहते वय 17 रा. बदलापूर मुंबई  हे जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!