व्हीटीसी फाट्याजवळ अपघात ; २३ वर्षीय गरोदर महिला, बालक, पती असे ३ जण गंभीर जखमी : खड्डे, जनावरे आणि कुत्रे ठरताय अपघाताला कारण

इगतपुरीनामा न्यूज, दि. 4

मुंबई आग्रा महामार्गावर अपघातांचे प्रमाण आता वाढू लागले आहे. अचानक जनावरे आणि कुत्रे रस्त्यावर आल्यामुळे सुद्धा अपघात घडत आहेत. यामुळे चिंतेत भर पडली असून आज दुपारी वाडीवऱ्हे कडून गोंदे दुमाला गावाकडे जाणाऱ्या मोटारसायकलला अपघात झाला. व्हीटीसी फाट्याजवळ खड्डा चुकवण्याच्या नादात हा अपघात झाला. यामध्ये ८ महिन्याची गरोदर महिला, बालक आणि तिचा पती असे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. गरोदर महिला निशा दीपक मोहिते वय 23, दीपक गजेंद्र मोहिते वय 30, राहुल दीपक मोहिते वय 8 सर्व राहणार गोंदे ( मूळ राहणार जळगाव ) अशी जखमींची नावे आहेत. दुसऱ्या अपघातात आनंदवन सोसायटीजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक म्हैस ठार झाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!