नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक बसवल्यामुळे अपघातांना मिळतेय निमंत्रण

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामार्गावर गेल्या अनेक महिन्यापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याच खड्यांवरून मागील महिन्यात विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पहावयास मिळाली होती, पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. मात्र इगतपुरी तालुक्यातील सिन्नर चौफुली, बोरटेंभे फाटा, पिंपरी फाटा येथे अजूनही खड्यांचे साम्राज्य असून वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशातच आज महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी अक्षरश: पेवर ब्लॉकचा वापर केला जात आहे. दोनच दिवसापूर्वी बसवलेले पेवर ब्लॉक अक्षरश: रस्त्यापासून निखळताना दिसत असून यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडू शकतात. दोनच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पेवर ब्लॉक महामार्गावर बसवल्या प्रकरणी  टीका केली होती. आणि त्यानंतर देखील महामार्गावर  पेवर ब्लॉक बसवण्याचं सत्र जोरात सुरू आहे.

Similar Posts

error: Content is protected !!